Join us

बॉलिवूडमध्ये एन्ट्री होताच झाला सुपरस्टार; 'तुम बिन' फेम 'या' अभिनेत्याला आता ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:50 IST

1 / 8
'तुम बिन' सिनेमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रियांशू चॅटर्जी. उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला.
2 / 8
या चित्रपटातील प्रियांशु चॅटर्जी आणि संधली शर्मा यांच्या फ्रेश जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आज २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी हा अभिनेता त्याचा ५० वा वाढदिवस साजर करतोय.
3 / 8
हिंदी, बंगाली सिनेमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवत त्याने इंडस्ट्रीत त्याचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही. तुम बिन नंतर त्याच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र, त्याचं हे यश सुद्धा फार काळ टिकलं नाही.
4 / 8
त्यानंतर त्याची तुलना बॉलिवूडच्या बड्या कलाकारांशी होऊ लागली. या चित्रपटाच्या यशानंतर अनुभव सिन्हाने त्याला आपल्या पुढच्या चित्रपट 'आपको पहले भी कहीं देखा है' मध्ये कास्ट केले. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही.
5 / 8
'दिल का रिश्ता', 'पिंजर', 'वो', 'जुली' आणि 'मदहोशी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. पण त्यानंतर तो बॉलिवूडमधून अचानक गायब झाला.
6 / 8
प्रियांशूने आपल्या कारकिर्दीत ऐश्वर्या राय, उर्मिला मातोंडर, अमिताभ बच्चन, मनोज बाजपेयी यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले, पण पहिल्याच चित्रपटाप्रमाणे यश त्याला परत मिळवता आले नाही.
7 / 8
मधल्या काळात प्रियााशुला चित्रपटांच्या ऑफर्स येत नसल्याने त्याने बॉलिवूडला कायमचा रामराम केला. अखेरीस या अभिनेत्याने बंगाली चित्रपटांकड आपला मोर्चा वळवला.
8 / 8
सध्याच्या घडीला या अभिनेत्याची तुलना बंगाली सिनेसृष्टीच्या टॉपच्या स्टार्समध्ये केली जाते. प्रियांशु चॅटर्जी अलीकडेच राजकुमार हिरानी आणि विक्रांत मॅसी यांच्या '12वी' फेल या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही त्यांची छोटीशी भूमिका होती. हिंदी चित्रपटांशिवाय प्रियांशूने अनेक बंगाली भाषेतील चित्रपटही केले आहेत.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी