Join us

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:52 IST

1 / 8
सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची चर्चा रंगत असते.
2 / 8
यामध्ये अनन्या पांडे, आलिया भट्ट,रणबीर कपूर हे स्टारकिड्स कायमच चर्चेत असतात. त्यात अलिकडच्या काळात राशा थडानी, इब्राहिम अली खान, शनाया कपूर तसेच जुनैद खान या स्टार किड्सनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं,
3 / 8
परंतु, या सगळ्यामध्ये चर्चा झाली ती इब्राहिम अली खानची. सैफ अली खानच्या पावलांवर पाऊल ठेवतं त्याच्या लाडक्या लेकाने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली.
4 / 8
मात्र, त्याचा पहिलाच डेब्यू 'नादानियॉं' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
5 / 8
त्यानंतर आता अमृता सिंग- सैफ अली खानचा लेक सरजमीन या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करतो आहे.
6 / 8
'सरजमीन' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात काजोल, इब्राहिम अली खान आणि साऊथ सुपरस्टार पृथ्वीराजची मुख्य भूमिका आहे.
7 / 8
येत्या २५ जुलैला हा देशभक्तीवर आधारित असलेला सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे.
8 / 8
विशेष म्हणजे इब्राहिम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या चित्रपटातून इब्राहिम प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टॅग्स :इब्राहिम अली खानकाजोलबॉलिवूडसिनेमा