By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:09 IST
1 / 7 एखाद्या पुरुष कलाकाराने स्त्री पात्राची भूमिका रंगमंचावर किंवा मोठ्या पडद्यावर साकारणं हे प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेले स्त्री पात्र हे याचं उत्तम उदाहरण आहे. हा मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम प्रयोगापैकी एक म्हणता येईल.2 / 7 हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव असा अभिनेता होता ज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे पारितोषिक घेतले आहे. हा अभिनेता म्हणजे निर्मल पांडे.3 / 7 निर्मल पांडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९६२ रोजी उत्तराखंडमधील नैनीताल ला कुमाऊनी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अल्मोरा आणि नैनीतालमध्ये झाले. अभिनयाची आवड लहानपणापासूनच असल्याने शालेय रंगभूमीवर त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं. 4 / 7 १९९६ मध्ये शेखर कपूर यांच्यासोबत निर्मल पांडे यांची झालेली भेट ही निर्मल पांडे यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली. ‘बँडीट क्वीन’ या चित्रपटामधील डाकू मल्लाहच्या भूमिकेसाठी शेखर कपूर यांनी मनोज वाजपेयी यांना ऑफर दिली होती. परंतु, निर्मल पांडेंना भेटल्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला. फूलन देवीचा प्रियकर आणि डाकू विक्रम मल्लाहच्या भूमिकेतून निर्मल पांडे यांनी रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली.5 / 7 १९९६ मध्ये आलेल्या दायरा’ मध्ये ‘ट्रान्सवर्सटाईल’ म्हणजेच विरुद्धलिंगी व्यक्तीसारखं राहण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीची भूमिका होती. ही कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक होती.एक स्त्री मानसिकता अंगीकारणे, त्या आवाजात बोलणं, तसं वावरणं हे आव्हान निर्मल पांडे यांनी लीलया पेललं. फ्रान्स फिल्म फेस्टीवलमध्ये ‘दायरा’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सोनाली कुलकर्णी, निर्मल पांडेला विभागून सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीचा संयुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.6 / 7 नकारात्मक भूमिकांपासून ते विनोदी छटा असणाऱ्या विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याऱ्या निर्मल पांडे यांनी त्यानंतर प्यार किया तो डरना क्या , हम तुम पे मरते हैं , हद कर दी आपने , दुबई , वन 2 का 4 , दिवानी , आंच , उलाढाल , मुद्रांक , केडी या चित्रपटातून त्यांची कारकिर्द बहरत गेली. अभिनयाव्यतिरिक्त, निर्मल पांडे गायक देखील होते, त्यांनी १९९९ मध्ये 'जज्बा' हा अल्बमही प्रदर्शित केला होता. 7 / 7 वैयक्तिक आयुष्यात १९९७ मध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानी असतांना निर्मल पांडे यांनी कौसर मुनीर यांच्यासोबत लग्न केलं. हे लग्न चार वर्षच टिकलं. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी अर्चना शर्मा यांच्याशी दुसऱ्यांदा संसार थाटला. पण, हे लग्न सुद्धा फार काळ टिकलं नाही. या घटनेने निर्मल पांडे प्रचंड खचले होते. १८ फेब्रुवारी २०१० रोजी वयाच्या केवळ ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या अभिनेत्याचं निधन झालं.