११४ कुत्रे पाळणारा बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेता, एकूण संपत्ती ४०० कोटींच्या घरात
By देवेंद्र जाधव | Updated: April 28, 2025 15:29 IST
1 / 7कोणाला गाड्यांचा शौक असतो, कोणाला घड्याळांचा, कोणाला डिझायनर बूटांचा. परंतु बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला कुत्रे पाळण्याचा शौक आहे. हा अभिनेता कोण? 2 / 7या अभिनेत्याचं नाव आहे मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्तींकडे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १०० हून जास्त कुत्रे आहेत.3 / 7मिथुन चक्रवर्तींचे त्यांच्या कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो दिसून येतात. मिथुन यांच्या मढ आयलंडवरील बंगल्यावर तब्बल ३६ कुत्रे आहेत.4 / 7याशिवाय मिथुन यांचा ऊटीमध्ये एक बंगला आहे. या बंगल्यावर मिथुन यांनी ३८ कुत्रे पाळले आहेत. त्यामुळे मिथुन यांच्याकडे १०० हून जास्त कुत्रे आहेत.5 / 7मिथुन चक्रवर्ती यांनी गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमधून अभिनय केलाय. मिथुन यांची स्टाईल, डान्सचे अनेकजण चाहते आहेत.6 / 7१९७६ साली मिथुन चक्रवर्ती यांनी 'मृगया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मिथुन चक्रवर्ती गेली ४९ वर्ष निरनिराळ्या भूमिकांमधून बॉलिवूड गाजवत आहेत7 / 7मीडिया रिपोर्टनुसार मिथुन चक्रवर्ती यांची नेटवर्थ ४०० कोटींच्या घरात आहे. मिथुन हे अभिनयक्षेत्रात सक्रीय असले तरीही त्यांचा लक्झरी हॉटेलचा व्यवसाय आहे.