1 / 7आजचा किस्सा एका अशा अभिनेत्याचा ज्याने वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. 2 / 7या अभिनेत्याचं नाव कुणाल सिंह. ९० च्या दशकाच्या अखेरीस कुणाल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा होती. सोनाली बेंद्रेसोबत 'दिल ही दिल में' या सिनेमातून कुणालने बॉलिवूड पदार्पण केलं3 / 7करिअर जोमात सुरु असताना कुणालने अचानक आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला. माझ्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं, असा कुणाल सिंहच्या वडिलांनी दावा केला4 / 7कुणालचं अनुराधा नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. या दोघांना दोन मुली होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, असं सांगण्यात येतं की.. कुणाल त्याच्या बायकोसोबत आनंदी नव्हता. त्याचदरम्यान कुणालचे अभिनेत्री लवीना भाटियासोबत जवळकीचे संबंध निर्माण झाले5 / 7कुणालची बायको अनुराधाला जसं हे समजलं तसं ती दोन मुलांना घेऊन तिच्या आई-वडिलांच्या घरी अहमदनगरला निघून गेली. अभिनय क्षेत्रातही विशेष संधी मिळत नसल्याने कुणाल नंतर असिस्टंट एडिटर झाला. परंतु ७ फेब्रुवारी २००८ रोजी कुणालने आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला.6 / 7कुणालने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री लवीना तिथेच होती. त्यामुळे अभिनेत्याने आत्महत्या केल्यावर पोलिसांनी लवीनाला बेड्या ठोकल्या7 / 7शेवटी लवीनाविरोधात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे तिला सोडण्यात आलं. त्यानंतर कुणालच्या वडिलांनी मुलाच्या आत्महत्येची केस पुन्हा उघडायला लावली. पुढे ही केस CBI ला देण्यात आली. खून नव्हे तर आत्महत्याच, असं निष्कर्ष CBI ने लावला. अशाप्रकारे कुणालने केलेल्या आत्महत्येने चांगलीच खळबळ माजली होती.