Join us

घाऱ्या डोळ्यांचा खलनायक! इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्याचे सोनाली बेंद्रेशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:33 IST

1 / 8
चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी सृष्टी आहे. येथे जोपर्यंत तुम्हाला यश मिळते तोपर्यंत तुम्हाला ओळख असते.अशाच एका विस्मरणात गेलेल्या अभिनेत्याची स्टोरी जाणून घेऊयात...
2 / 8
१९६० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकांच्या परंपरेत घाऱ्या डोळ्यांच्या नायकाने एन्ट्री घेतली.जवळपास तीन दशकं आपल्या अभिनयाची जादू सिनेरसिकांचं मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे कमल किशोर कपूर.५० वर्षांच्या कारकिर्दीत ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. या अभिनेत्याने केवळ हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर गुजराती आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली.
3 / 8
कमल कपूर यांचा जन्म १९२० मध्ये झाला.त्याचं शिक्षण पाकिस्तानातील लाहोर येथे झालं.तुम्हाला माहितीये का? खलनायिकी भूमिकांतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कमल कपूर यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक चित्रपटांमधून नायक साकारला होता.पण पुढे त्यांनी खलनायकी भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली.
4 / 8
आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि घाऱ्या डोळ्यांमुळे 'पृथ्वी थिएटर' च्या 'दिवार' या नाटकातील एका इंग्रज अधिकाऱ्याच्या भूमिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
5 / 8
कमल कपूर यांना लोक १९६५ साली आलेल्या 'जोहर महमूद इन गोवा' या चित्रपटातून खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखू लागले.
6 / 8
१९४६ साली कमल कपूर यांना फनी मुजूमदार दिग्दर्शित दूर चलें या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पणाची संधी मिळाली. ‘डॉन’, 'दिवार', 'खेल खेल में', 'मर्द' आणि 'तूफान' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.
7 / 8
कमल कपूर यांना ३ मुले व २ मुली होत्या. कमल कपूर यांचे धाकटे जावई स्वर्गीय रमेश बहल हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक होते.गोल्डी बहल हा कमल कपूर यांचा नातू आहे.
8 / 8
गोल्डी 'बस इतना सा ख्वाब है', 'द्रोण' या चित्रपटांसाठी तर 'रिपोर्टर्स' आणि 'आरंभ' या टीव्ही मालिकांसाठी ओळखला जातो. अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही गोल्डी बहलची पत्नी आहे.
टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूडसेलिब्रिटी