Join us

एकेकाळी सलमानला द्यायचा टक्कर! 'त्या' आरोपामुळे होत्याचं नव्हतं झालं; ३ लग्नानंतरही एकटाच राहिला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:28 IST

1 / 8
हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे स्वतःला मुख्य भूमिकेत सिद्ध करण्यासाठी सतत धडपड करत राहिले. अशाच अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता इंदर कुमार.
2 / 8
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदर कुमारने 'खतरों के खिलाडी’, 'मासूम',' तुम को ना भूल पायेंगे’ आणि 'वॉन्टेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकरल्या.
3 / 8
इंदर कुमारचा जन्म २६ ऑगस्ट १९७३ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शालेय शिक्षण व फोर्ट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने अभिनयात करिअर करायचं ठरवलं.
4 / 8
मात्र, त्याला नशिबाने काही साथ दिली नाही. वैयक्तिक आयुष्यात त्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला.
5 / 8
साल २००२ मध्ये त्याच्यासोबत एक दुर्घटना घडली आणि त्याचा परिणाम अभिनेत्याच्या करिअरवर झाला. जवळपास २ वर्षे तो इंडस्ट्रीपासून दूर होता. 'मसीहा' या चित्रपटातील एका दृश्यात हेलीकॉप्टरमधून उडी घेण्याचा शॉट द्यायचा होता. त्यासाठी बॉडी डबलची मदत न घेता त्याने तो सीन स्वत चित्रित करण्याचं ठरवलं.
6 / 8
त्या सीनदरम्यान इंदरने हेलीकॉप्टरमधून उडी घेतली आणि त्याचा अपघात झाला. त्या जीवघेण्या अपघातात त्याचे दोन्ही गुडघे तुटले. तो सहा महिने चालू शकला नव्हता.
7 / 8
२०१४ मध्ये, इंदर कुमारवर एका २३ वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणी अभिनेत्याला अटक देखील करण्यात आलं होतं. दीड महिन्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. या प्रकरणामुळे अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला होता. अखेरीस २८ जुलै २०१७ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
8 / 8
इंदर कुमार त्याच्या चित्रपटांपेक्षा लव्हलाईफमुळेही चर्चेत होता. दोनदा संसार मोडल्यानंतर त्याने मॉडेल पल्लवी सराफसोबत लग्न केलं. २०१४ मध्ये, इंदर कुमारवर एका २३ वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणी अभिनेत्याला अटक देखील करण्यात आलं होतं. दीड महिन्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. या प्रकरणामुळे अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला होता. अखेरीस २८ जुलै २०१७ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी