1 / 9'जाने तू या जाने ना' या गाजलेल्या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे इमरान खान.2 / 9गेल्या काही वर्षात त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र,सोशल मीडियावर तो सक्रीय आहे.3 / 9गेल्या काही वर्षात त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र,सोशल मीडियावर तो सक्रीय आहे.4 / 9नुकतंच इमरानने कर्जतजवळ त्याचा छान मोठा असा अलिशान बंगला बांधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याविषयी चाहत्यांना माहिती दिली.5 / 9इमरानने कर्जत जवळील एका डोंगराळ भागात त्याचा आलिशान बंगला बांधला आहे. विशेष म्हणजे गावांमध्ये घरं बांधण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो. त्या पद्धतीचा वापर त्याने हा बंगला बांधतांना केला आहे.6 / 9इमरानने त्याच्या घराचे काही इनसाईड आणि आऊटसाईड फोटो शेअर केले आहेत. यावरुन त्याचं घर नेमकं कस आहे याचा अंदाज नेटकऱ्यांना येतो.7 / 9या घरात प्रशस्त मोठं लिव्हिंग रुम असून घरात हवा खेळती रहावी यासाठी मोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत.8 / 9निसर्गाच्या सानिध्यात घर असावं असं इमरानचं स्वप्न होतं. जे त्याने पूर्ण केलं.9 / 9इमरानच्या या घरात प्रत्येक रुम मोठी आणि प्रशस्त बांधण्यात आल्याचं त्याच्या बेडरुमकडे पाहिल्यावर अंदाज येतो.