Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्ष संसार, पदरात २ मुली अन्...; कोण होती अर्जुन रामपालची पहिली पत्नी? १४ वर्षांनी लहान मुलीवर झालाय लट्टू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:08 IST

1 / 7
अलिकडेच ५ डिसेंबर २०२५ रोजी धुरंधर हा स्पाय अॅक्शन चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इकबाल नावाची व्यक्तिरेखा साकारून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
2 / 7
याचदरम्यान, बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन रामपाल आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे.यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
3 / 7
गेली सहा वर्षे तो प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत 'लिव्ह-इन'रिलेशनशिपमध्ये होता. एकीकडे अभिनेत्याच्या साखरपुड्याची चर्चा असताना त्याची पहिली पत्नी मेहर जेसिया लाईमलाईटमध्ये आली आहे.
4 / 7
अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी १९९८ मध्ये लग्न केलं. अर्जुन-मेहर हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वात पावर कपल म्हणून ओळखलं जायचं.
5 / 7
अर्जुन रामपालची पहिली पत्नी मेहर जेसिका मॉडेल आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. अर्जुन व मेहर यांनी 30 एप्रिल 2019 रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या दोघांनीही सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
6 / 7
अर्जुन व मेहर यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर या दोन्ही मुली त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहरकडे राहतात.
7 / 7
मेहरसोबत बिनसले असतानाच अर्जुन गॅ्रबिएलाच्या प्रेमात पडला होता. २००९ मध्ये आयपीएल आॅफ्टर पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली होती. हळूहळू दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. जेसिकापासून विभक्त झाल्यावर अर्जुन ग्रॅबिएलासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला.
टॅग्स :अर्जुन रामपालधुरंधर सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा