ना धर्मेंद्र अन् जयदीप अहवालतही नाही! 'इक्कीस'साठी 'या' अभिनेत्याने घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:54 IST
1 / 8 हिंदी कलाविश्वात सध्या मॅडॉक फिल्म्सच्या आगामी इक्कीस या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत.2 / 8 या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र शेवटचे झळकले. त्यामुळे हा चित्रपटाचं प्रेक्षकांशी भावनिक कनेक्शन निर्माण झाल्याचं दिसतंय. या सिनेमाद्वारे भारतीय सेनेच्या शौर्याची आणि अरुण खेत्रपाल यांच्या बलिदानाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 3 / 8 इक्कीस हा बहुचर्चित चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे. या युद्धात २१ वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी शौर्य दाखवून परमवीर चक्र मिळवले होते.4 / 81 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. श्रीराम राघवन यांच्या या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, जाणून घेऊ...5 / 8 दिवंगत अभिनेते यांचा हा शेवटचा चित्रपट आहे.वृत्तानुसार, धर्मेंद्र यांना त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी मानधन म्हणून २० लाख रुपये देण्यात आले होते. जे तुलनेने फार कमीच आहे. 6 / 8 अमिताभ आणि जया बच्चन यांचा नातू, अगस्त्य नंदा, 'इक्कीस' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.याआधीही त्याने द आर्चिज या चित्रपटात काम केलं आहे. पण, हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.मीडिया रिपोर्टनुसार, अगस्त्याला या चित्रपटासाठी सर्वाधिक ७० लाख रुपये मानधन घेतलं आहे. 7 / 8 बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा जयदीप अहलावत 'इक्कीस' या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.8 / 8'इक्कीस' या चित्रपटात अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिमरने या चित्रपटासाठी ५ लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती मिळते आहे.