Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान वयातच आई-वडिलांंचं छत्र हरपलं! पोटासाठी सेल्समनची नोकरी केली, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:53 IST

1 / 8
चित्रपटसृष्टीत कोणाचं नशीब केव्हा फळफळेल सांगता येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पहिलाच चित्रपट हिट पण, त्यानंतरचे सगळे चित्रपट आपटले.पण, या अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडून लोकप्रियतेचं शिखर गाठणारा अभिनेता म्हणजे अर्शद वारसी.
2 / 8
अभिनयाची क्षमता असतानाही या अभिनेत्याला यशासाठी वाट पाहावी लागली. मुन्नाभाई एमबीबीएसमधील सर्किटची भूमिकेनंतर अर्शदच्या करिअरला कलाटणीच मिळाली.
3 / 8
अर्शद वारसीचा जन्म १९ एप्रिल १९६८ ला मुंबई येथे झाला. नाशिक येथील बरनेस बोर्डिग स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या १४ व्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर जीवनात अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या १७ व्या वर्षी सेल्समन म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
4 / 8
१९८७ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित 'ठिकाणा'और 'काश' या चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिलं आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की, अर्शद वारसी हा ११९१ साली भारतात झालेल्या इंडियन डान्स कॉम्पीटिशनचा विजेता आहे. त्याचबरोबर त्याने रुप की रानी, चोरों का राजा या चित्रपटाचे टायटल साँग देखील कोरियोग्राफ केले आहे.
5 / 8
अमिताभ बच्चन यांच्या होम प्रोडक्शन कंपनीतर्फे आलेल्या तेरे मेरे सपने हा अर्शदचा करिअरमधील पहिला चित्रपट. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला तेरे मेरे सपने हा चित्रपट चांगलाच गाजला. पण, त्यानंतर अर्शदच्या कोणत्याही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्याचे बरेच चित्रपट सपशेल आपटले.
6 / 8
अखेरीस २००३ मध्ये त्याला एक चित्रपट मिळाला, ज्याने अर्शद केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटरसिकांच्या हृदयावर राज्य करु लागला. या चित्रपटाचं नाव म्हणजे मुन्नाभाई एम.बी.बी.एस. यातील सर्किटच्या भूमिकेतील त्याचा अभिनय सर्वांच्या पसंतीस उतरला.
7 / 8
त्याचे 'मैने प्यार क्यू किया','सलाम नमस्ते','गोलमाल','लगे रहो मुन्नाभाई','इश्किया','जॉली एल.एल.बी.', जॉली एल. एल. बी. 3'हे चित्रपट गाजले.शिवाय 'लगे रहो मुन्नाभाई'करिता त्याला फिल्मफेअर अ‍ॅवार्ड मिळाला.
8 / 8
दरम्यान,१९९९ मध्ये अर्शदने व्ही.जे. मारिया गोरेटीशी विवाह केला. चित्रपटांव्यतिरिक्त अर्शदने छोट्या पडद्यावरही नाव कमावलं आहे. सध्याच्या घडीला तो इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे.
टॅग्स :अर्शद वारसीबॉलिवूडसेलिब्रिटी