Photos: कुठे हरवली बॉबी डार्लिंग? इतक्या वर्षात झालाय कमालीचा बदल; पाहा आता कशी दिसते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:47 IST
1 / 8तुम्हाला बॉबी डार्लिंग आठवते का? अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करुन बॉबी डार्लिंग प्रकाश झोतात आली होती.2 / 8बॉबी डार्लिंग म्हणजे आताची पाखी शर्मा. एकेकाळी बॉबीने बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, काही वर्षांनी ती अचानकपणे कलाविश्वापासून दूर झाली. त्यामुळेच ही बॉबी सध्या काय करते? कशी दिसते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.3 / 8आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बॉबीला खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख, संकटांचा सामना करावा लागला. 4 / 8गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वापासून दूर गेलेली बॉबी एका सेल्फीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिचा एक सेल्फी शेअर केला आहे.5 / 8बॉबीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची वेगळी दिसत असून आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे.6 / 8 या फोटमध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने चंदीगड करे आशिकी' या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी ती चित्रपटगृहात गेली होती.7 / 8लग्नानंतर बॉबीचा कलाविश्वातील वावर कमी झाला. बॉबीने तिच्या मित्रासोबतच लग्न केल्याचं सांगण्यात येतं.8 / 8पण लग्नाच्या काही दिवसांनंतर तिने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट घेतला. त्यानंतर मध्यंतरी बॉबीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता.