1 / 11आज संगीता बिजलानी 60 वर्षांची झाली. 2 / 11 1980 साली तिने मिस इंडियाचा किताब जिंकला. वयाच्या 16 व्या वर्षी संगीताने मॉडेलिंग सुरु केले होते.3 / 11मॉडेलिंग करिअरमध्ये तिने अनेक मोठमोठ्या ब्रँडसोबत काम केले.4 / 11मॉडेलिंगच्या दिवसात संगीताच्या ग्लॅमरवर सगळेच फिदा होते. तिच्या ग्लॅमरमुळे मॉडेलिंग दुनियेत तिला बिजली म्हणून ओळखले जात होते.5 / 111988 साली कातिल या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.6 / 11तिला खरी ओळख मिळाली ती 1989 साली आलेल्या ‘हथियार’ या सिनेमाने.7 / 11यानंतर त्रिदेव, जुर्म, योद्धा, खून का कर्ज अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली.8 / 11करिअरच्या काळात तिच्या व सलमान खानच्या अफेअरच्या चर्चा ब-याच गाजल्या होत्या.9 / 11सलमान व संगीता लग्न करणार होते. असे म्हणतात की या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण अचानक हे नाते तुटले.10 / 111996 साली संगीताने क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केले. 2010 साली दोघांचा घटस्फोट झाला.11 / 111996 साली आलेल्या ‘निर्भय’ या सिनेमात संगीता अखेरची झळकली. यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. आता ती दिसते ती केवळ बॉलिवूडच्या इव्हेंटला आणि सलमानच्या घरच्या पार्ट्यांना.