Join us  

IN PICS : एकदा चालवली की पुढच्या वर्षीच येतो त्या गाडीचा नंबर, ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 1:41 PM

1 / 10
मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार ममूटी आज 71 वर्षांचे झालेत. 1951 साली आजच्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता. खरं तर ममूटी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ममूटी यांना ‘साऊथचे अंबानी’ म्हणून ओळखतात.
2 / 10
गेल्या 5 दशकांपासून मल्याळम सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या ममूटींनी अभिनयात येण्याआधी 2 वर्षे वकीली केली होती. पण अभिनयाची आवड असल्याने त्यांनी वकीली सोडली आणि त्यांचा हा निर्णय त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला.
3 / 10
साऊथचे अंबानी म्हणून ते ओळखले जातात. आपल्या लक्झरी लाईफ स्टाईलसाठी ते ओळखले जातात. अलिशान गाड्यांची त्यांना प्रचंड आवडत आहे. ऑडी खरेदी करणारे ते पहिले साऊथ स्टार मानले जातात.
4 / 10
ममूटींकडे किती गाड्या असाव्यात तर 369. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. स्वस्तापासून महागड्यातील महागड्यातील गाडी त्यांच्या ताफ्यात आहे.
5 / 10
त्यांनी गाड्यांसाठी खास स्वतंत्र गॅरेज बांधलं आहे. त्यांच्या बहुतेक गाड्यांचा नंबर 369 आहे. मारूती ब्रँडवर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यांनी मारूतीची पहिली गाडी घेतली होती. त्यांच्याकडे आजही मारूतीचे तीन मॉडेल्स आहेत.
6 / 10
याशिवाय टोयोटा लँड क्रूझर एलसी 200, फेरारी, मर्सिडीज, ऑडी, पोर्श, एफ 10 बीएमडब्ल्यू 530 डी, 525 डी, ई 46 बीएमडब्ल्यू एम 3, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स, फॉक्सवॅगन पैसेट एक्स 2 अशा महागड्या व अलिशान गाड्या त्यांच्या दिमतीला उभ्या आहेत.
7 / 10
ममूटी एका सिनेमासाठी सुमारे 10 कोटी फी घेतात. एका रिपोर्टनुसार, ते वर्षाला 50 कोटींची कमाई करतात. finapp.co.in या वेबसाईटनुसार, ममूटी 300 कोटींपेक्षा अधिकच्या संपत्तीचे मालक आहेत.
8 / 10
अर्थात इतक्या कोटींचे मालक असूनही त्यांना आजही पैशाचं नियोजन जमत नाही. त्यामुळेच आपली सर्व कमाई आजही ते आपल्या पत्नीकडे देतात. त्यांची पत्नी त्यांचे सर्व आर्थिक निर्णय घेते. ममूटी यांनी स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
9 / 10
ममूटी यांनी 1979 साली सुलफतसोबत लग्न केलं. सुलफत माझी बेस्ट फ्रेन्ड असल्याचं ते सांगतात. साऊथचा सुपरहिट हिरो दुलकर सलमान हा ममूटी यांचा मुलगा. त्यांना आणखी एक मुलगी आहे.
10 / 10
चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चित्रपट करण्याचा विक्रम ममूटी यांच्या नावावर आहे. ममूटी यांनी 80 च्या दशकात वर्षभरात 35 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. मल्याळम चित्रपटांमध्ये त्यांनी सर्वाधिक दुहेरी भूमिका केल्या आहेत.
टॅग्स :ममूटीTollywood