Join us
Daily Top 2Weekly Top 5

आताही तितकीच सुंदर दिसते 'मैने प्यार किया' मधील सुमन, आता कुठे आहे गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:09 IST

1 / 7
१९८९ साली आलेला मैने प्यार किया हा चित्रपट बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला.हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
2 / 7
मैने प्यार किया चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
3 / 7
या चित्रपटात सुमन नावाची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री पटवर्धनने तिच्या सौंदर्य आणि अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
4 / 7
या चित्रपटानंतर सलमानचे करिअर उंचावले परंतू भाग्यश्रीने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत १९९० मध्ये लग्न केलं. यानंतर ती सिनेविश्वापासून दूर झाली. या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुलं आहेत. सध्या भाग्यश्री अनेक रिअॅलिटी शोजमध्ये पाहायला मिळते.
5 / 7
भाग्यश्रीने कच्ची धूप या मालिकेतून तिच्या अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. तिचा अभिनय पाहून अमोल पालेकर यांनी तिला चित्रपटात येण्यास सुचवलं होतं.
6 / 7
सध्या भाग्यश्री अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
7 / 7
मैने प्यार किया मधील ही गोड आणि सुंदर दिसणारी नायिका आता फारच बदलली आहे. भाग्यश्री आता पूर्वीपेक्षा अधिकच सुंदर दिसत चालली आहे. तिचे फोटो पाहून चाहते देखील भाळले आहेत.
टॅग्स :भाग्यश्रीसलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया