Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिलं प्रेम गमावलं, नंतर 2 विवाहित पुरूषांवर जडलं मन; अरूणा ईराणी यांची कहाणी वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:06 IST

1 / 7
Aruna Irani On Her Marriage : बॉलिवूडमध्ये अरूणा ईराणी हे एक मोठं नाव आहे. वेगवेगळ्या भूमिकातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. पण खऱ्या आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याचा खुलासा स्वत: अरूणा ईराणी यांनी एका मुलाखतीत केला आहे. अरूणा यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात 9 वर्षांच्या असताना केली होती. दिलीप कुमार यांच्या गंगा जमुना सिनेमात त्या चाइल्ड आर्टिस्ट म्हणून होत्या. नुकताच अरूणा यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. सोबतच हेही सांगितलं की, विवाहित पुरूषांच्या प्रेमात पडणं काही सोपं काम नाहीये.
2 / 7
अरूणा ईराणी यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. पण त्यांनी त्यांच्या संघर्षाचा परिणाम आपल्या कामावर कधी होऊ दिला नाही. आता इतक्या वर्षानंतर त्यांनी स्वत: समोर येऊन आपलं आणि आणि लव्ह अफेअरबाबत मौन सोडलं आहे.
3 / 7
त्यांनी सांगितलं की, कशा त्या विवाहित पुरूषांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी मी असं करणं काही सोपं काम नव्हतं. प्रेमाची शिक्षा फार त्रासदायक असते. हे सगळं त्यांनी सांगितलं.
4 / 7
बालपणी अरूणा एका अशा व्यक्तीला भेटल्या होत्या जो त्यांच्यावर प्रेम करत होता. त्या सुद्धा त्याला पसंत करत होत्या. पण वेळेनुसार दोघांचं नातं पुढे टिकलं नाही. ती व्यक्ती गायब झाली. पण नंतर विनोद खन्ना यांनी त्यांना त्यांच्या प्रेमासोबत भेटवलं. ती व्यक्ती दुसरी कुणी नसून विनोद खन्ना यांचा भाऊ प्रमोद खन्ना होता. पण तोपर्यंत खूप काही बदललेलं होतं. अरूणा यांच्या जीवनात डायरेक्टर कुकु कोहली आले होते. त्यांनी 1990 मध्ये डायरेक्टरसोबत लग्न केलं.
5 / 7
करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अरूणा ईराणी आणि महमूद यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. दोघांनी अनेक सिनेमात सोबत काम केलं. पण महमूद आणि आपल्या नात्याबाबत अरूणा यांनी सांगितलं की, ते फार चांगले मित्र होते. याला मैत्री, आकर्षण किंवा आणखीही काही म्हणू शकता. पण महमूद यांच्यासोबत प्रेम ही केवळ अफवा असल्याचं त्या म्हणाल्या.
6 / 7
नुकत्याच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अरूणा म्हणाल्या की, 'कोणत्याही विवाहित पुरूषासोबत लग्न केल्यावर अनेक समस्या होतात. जसे की, सध्या माझं लग्न एका विवाहित पुरूषासोबत झालं आहे. मी सुद्धा विवाहित होते. जे कुणालाही माहीत नव्हतं. पण एक वर्षाआधी कुकूच्या पत्नीचं निधन झालं. आता मोठ्या हिंमतीने मी हे म्हणू शकते मला कुणाला दुखवायचं नाहीये. माझं आणि कुकूचं नातं कुणालाही दुखवण्यासाठी किंवा कुणाकडून काही हिसकावण्यासाठी नव्हतं'.
7 / 7
टॅग्स :अरुणा इराणीबॉलिवूड