Join us

Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:28 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आपल्या स्पष्ट, मनमोकळ्या आणि हलक्याफुलक्या YouTube व्लॉग्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. व्लॉग्समध्ये, अर्चना अनेकदा त्यांच्या कुटुंबासह आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याची झलक दाखवतात.
2 / 9
नव्या व्हिडिओमध्ये, अर्चना आपल्या कुटुंबासह मुंबईत पारंपारिक गुजराती थाळीचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. व्लॉग दरम्यान, अर्चना यांनी मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि एक-एक रुपया कसा महत्त्वाचा होता हे सांगितलं.
3 / 9
रेस्टॉरंटमध्ये आल्यावर, अर्चना म्हणाल्या की, 'एक काळ असा होता जेव्हा डोसा १० रुपयांना मिळायचा. माझ्याकडे फक्त १० रुपयेच असायचे आणि टिपसाठी १ रुपया होता. '
4 / 9
'माझे मित्रमैत्रिणी मला विचारायचे की मी लस्सी का घेत नाही. त्यावर मी म्हणायचे की, माझ्याकडे फक्त ११ रुपये होते आणि मी तेवढेच खर्च करू शकते. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं होतं.'
5 / 9
अर्चना अनेकदा आपल्या संघर्षांबद्दल बोलल्या आहे. त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या आईने तिला फक्त एका सुटकेससह दिल्लीहून मुंबईला त्यांना पाठवलं. वयाच्या २० व्या वर्षी बीआर चोप्रा यांच्या 'निकाह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6 / 9
'अग्निपथ', 'सौदागर', 'शोला और शबनम', 'आशिक आवारा' आणि 'राजा हिंदुस्तानी' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या इतर काही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये 'बोल बच्चन', 'कुछ कुछ होता है' आणि 'मोहब्बतें' यांचा समावेश आहे.
7 / 9
अर्चना इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांनी अभिनय केलेल्या करण जोहरच्या 'नादानियां' चित्रपटात दिसल्या. चित्रपटाचा रिव्ह्यू चांगला नव्हता. तसेच इब्राहिम आणि खुशीच्या अभिनयावर टीका झाली.
8 / 9
हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. अर्चना सध्या कॉमेडियन कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स शो, 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये नवजोत सिंग सिद्धू यांच्यासोबत देखील दिसतात.
9 / 9
टॅग्स :अर्चना पूरण सिंगबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार