India's Richest Singer : भारतातील सर्वात श्रीमंत गायक कोण ? एका गाण्यासाठी घेतो ३ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:22 IST
1 / 10 आपण कशाही मूडमध्ये असलो तरी संगीत आपल्याला नेहमीच साथ देतं. गीतामुळे मनाला उभारी मिळते, तर आनंदी असताना, काही क्षण एन्जॉय करतानाही चांगलं संगीत ते क्षण अविस्मरणीय करतं. अनेक आजारपणांमध्ये उपचार म्हणूनही संगीत थेरेपीचा वापर केला जातो. 2 / 10असे अनेक गायक आहेत, ज्यांची गाणी ऐकल्यावर भान हरपून जाते आणि मन मंत्रमुग्ध होतं. सध्या असाच एक गायक चर्चेत आहे. अनेक जण त्याच्या गाण्यांची पारायणं करत असतात, तीच गाणी रिपीट मोडवर तासनतास ऐकत असतात. तो भारतातील सर्वांत श्रीमंत गायक आहे. विशेष म्हणजे या गायकाने ऑस्कर पटकावलेला आहे. 3 / 10तो गायक म्हणजे ए. आर. रेहमान (A R Rahman). ए. आर. रेहमान यांचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये समावेश होतो.4 / 10ए. आर. रेहमान हे एका गाण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये मानधन घेतात. GQ च्या रिपोर्टनुसार, एआर रहमान यांची एकूण संपत्ती 1,728 कोटी रुपये आहे.5 / 10ए. आर. रेहमानची प्रतिभा सर्वांनाचा माहीत आहे. त्यांनी अनेक सुमधुर गाणी तर दिली आहेत. ए. आर. रेहमान यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. 6 / 10सुंपर्ण जग त्यांना ए. आर. रेहमान या नावाने ओळखतं. पण, त्यांचं मूळ नाव दिलीप कुमार होतं. मूळच्या हिंदू कुटुंबात जन्मलेल्या ए. आर. रेहमान यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे. एआर रहमान यांचं पूर्ण नाव अल्लाह राखा रहमान असं आहे.7 / 10ए.आर. रेहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 8 / 10ए. आर. रहमान यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.9 / 10 ए. आर. रेहमान यांची अनेक गाणी रसिकांच्या विशेषत: तरुणाईच्या मनात स्थान निर्माण करुन आहेत. 10 / 10'दिल से', 'ख्वाजा मेरे ख्वाजा', 'जय हो''बॉम्बे', 'रंगीला', 'दिल से', 'ताल', 'जींस', 'पुकार', 'फिजा', 'लगान', 'स्वदेस', 'जोधा-अकबर', 'युवराज', 'स्लमडॉग मिलेनियर' ही गाणी चाहेत पुन्हा-पुन्हा ऐकतात.