Join us

अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:31 IST

1 / 9
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आर्मी बॅकग्राऊंडमधून आली आहे. रिटायर्ड कर्नल अजय कुमार शर्मा हे तिचे वडील आहेत.
2 / 9
१९८२ नंतरचं प्रत्येक युद्ध ते लढले आहे, ऑपरेशन ब्लूस्टार असो किंवा कारगिल युद्ध. वडील कारगिल युद्ध लढत असताना अनुष्का फक्त ११ वर्षांची होती.
3 / 9
अभिनेत्रीने २०१२ मध्ये दिलेल्या तिच्या जुन्या मुलाखतीत १९९९ मध्ये झालेल्या या युद्धात तिचे वडील लढल्याचा उल्लेख केला होता.
4 / 9
जेव्हा तिचे वडील घरी फोन करायचे. तेव्हा ती त्यांच्याशी तिचे बॉयफ्रेंड आणि शाळेबद्दल बोलत असायची. वडील युद्धक्षेत्रात आहेत हे तेव्हा तिला समजायचं नाही.
5 / 9
अनुष्काने ETimes शी बोलताना म्हटलं होतं की, 'कारगिल युद्ध कठीण होतं. मी तेव्हा खूप लहान होते. पण आईला पाहून मला भीती वाटली.'
6 / 9
'ती दिवसभर फक्त बातम्यांचे चॅनेल पाहत असे. जेव्हा जेव्हा कोणी मारलं गेल्याची घोषणा व्हायची तेव्हा ती अस्वस्थ व्हायची.'
7 / 9
'एका आर्मी ऑफिसरची मुलगी असल्याचा अभिमान आहे. मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे' असंही अनुष्काने म्हटलं आहे.
8 / 9
८ मे रोजी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.
9 / 9
टॅग्स :अनुष्का शर्माभारतीय जवानबॉलिवूड