Join us

अनुराग कश्यपच्या मुलीचं ६ महिन्यात २ लग्न, पुन्हा चढली बोहोल्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:23 IST

1 / 10
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यप हिने पुन्हा एकदा लग्न केलंय. सहाच महिन्यात तिनं दोनदा लग्न केलं आहे.
2 / 10
आलिया कश्यप हिनं शेन ग्रेगॉयर (Shane Gregoire) याच्यासोबत विवाह केला आहे.
3 / 10
4 / 10
आलिया आणि शेन यांनी पहिल्यांदा भारतीय पद्धतीनं लग्न केलं होतं. त्या लग्नात आलियाने पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केला होता.
5 / 10
आता लग्नाच्या सहा महिन्यांनी या जोडप्याने पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
6 / 10
आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर या खास दिवशीचे काही सुंदर क्षण शेअर करत लिहिलं, 'We got married again!'. आलिया आणि शेनच्या या स्वप्नवत लग्न सोहळ्याचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
7 / 10
या दोघांचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आलियाच्या पांढऱ्या गाऊनमध्ये 'ड्रीमी ब्रायडल' लूकने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तर तिचा पती शेन हादेखील डॅशिंग दिसत होता.
8 / 10
आलियाच्या ब्रायडल लूकमधली सर्वात खास गोष्ट म्हणजे तिनं परिधान केलेला ड्रेस. हा ड्रेस तिचा नाही तर तिच्या सासूबाईंचा आहे, म्हणजेच शेनच्या आईचा. त्यांनी तब्बल ३० वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नात हा ड्रेस घातला होता. तोच ड्रेस आलियानं तिच्या या खास दिवशी परिधान केला आणि आपल्या लूकला एक खास, भावनिक स्पर्श दिला.
9 / 10
पुन्हा एकदा लग्न केल्यामुळे आलिया आणि शेन सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. आलियाचा पती शेन हा एक अमेरिकन बिझनेस मॅन आहे. त्याचं एक युट्यूब चॅनलदेखील आहे.
10 / 10
आलिया कश्यप आणि शेन हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. आलिया २३ वर्षांची असून शेन ग्रेगोयर २४ वर्षांचा आहे.
टॅग्स :अनुराग कश्यपलग्न