By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 11:33 IST
1 / 10अनुपमा परमेश्वरन ही साऊथच्या चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अल्पावधीतच देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. एवढंच नाही तर तिला मोस्ट पॉप्युलरचा किताबही मिळाला आहे. ती लवकरच 'कार्तिकेय 2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून तिनं लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.2 / 10अनुपमानं तिचे साडीतील लेटेस्ट फोटोशूट (Anupama Parameswaran Latest Photoshoot) इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये ती निळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच क्यूट दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोकळे केस, डोळ्यात काजळ, न्यूड मेकअप, नाजुक कानातले आणि कपाळावर काळी बिंदी असा तिचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी आहे. 3 / 10अनुपमाच्या फोटोंना चाहत्यांनी साडेपाच लाखांहून अधिक लाईक्स दिले आहेत. लोक त्याच्या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. 4 / 10How sweet to be a Cloud. Floating in the Blue! अशा कॅप्शनसह अनुपमाने फोटो शेअर केले आहेत. 5 / 10फोटोंवरील यूजर्सच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचं झालं तर अनुपमाचं सौंदर्य पाहून युझर्स घायाळ झालेले पाहायला मिळतात. 6 / 10अनुपमाचे हे साडीतील फोटो युझर्स वारंवार पाहात असून तिच्या आरसपानी सौंदर्याचं कौतुक करत आहेत. 7 / 10साडीत अनुपमाचं सौंदर्य आणखीच खुलून आले आहे. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला कदाचित शब्द कमी पडतील.8 / 10तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेय. 2015 साली प्रेमम या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली.9 / 102016 साली जेम्स अॅण्ड एलिस या मल्याळम सिनेमात ती झळकली. अनुपमा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.10 / 10सध्या ती 18 पेज आणि कार्तिकेय 2 च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय बटरफ्लाय या सन्पेन्स थ्रीलर चित्रपटातही ती दिसणार आहे.