Join us  

अमिताभ बच्चन स्वस्तात विकत आहेत त्यांची ही कोट्यवधींची कार, कारण वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 11:29 AM

1 / 12
कोरोनाला मात देऊन काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच घरी परतलो आणि त्यांनी केबीसीचं शूटींगही सुरू केलंय. यादरम्यान बच्चन परिवारात एका नव्या कारची एन्ट्री झालीय. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी S Class मर्सिडीज कार खरेदी केली असून याची किंमत १ कोटी ३८ लाख रूपये आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, त्यांची जुनी कोट्यवधी रूपये किंमतीची कार विकत आहेत. महत्वाची बाब म्हणजे ते ही कार फार कमी किंमतीत विकत आहेत.
2 / 12
अमिताभ बच्चन यांच्याकडे Porsche Cayman S कार आहे. जी एक लक्झरी स्पोर्ट्स कार आहे. स्वत: अमिताभ बच्च आणि अभिषेक ही कार ड्राइव्ह करताना बघितले गेले. पांढऱ्या रंगाची ही कार १४ वर्षे जुनी आहे आणि त्यांनी ही कार २००६ मध्ये खरेदी केली होती. खास बाब ही आहे की, ही कार केवळ ३७०० किमी चालली आहे.
3 / 12
बिग बींच्या या कारवर साधा स्क्रॅचही नाही. ही कार विकण्याचं जे कारण येतंय ते हे आहे की, एकतर त्यांच्या गॅरेजमध्ये जागा नाही किंवा ही कार १४ वर्षे जुनी झाली आहे.
4 / 12
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५ वर्षांनी कारचं पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल. कदाचित हेच कारण आहे की, कोट्यवधी किंमत असलेली ही कार ते ३० लाख रूपयांना विकत आहेत. तसेच या कारचा नंबरही व्हीआयपी ११ नंबर आहे. गेल्यावर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांची रॉल्स रॉयस घोस्ट विकली होती. ही कार त्यांना विधु विनोद चोप्राने गिफ्ट केली होती.
5 / 12
बच्चन परिवाराकडे अनेक प्रकारच्या कार्स आहेत. रोल्स रॉयससारख्या कारचे मालक असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक कार आली आहे. या कारचा नंबर MH02FJ4041 आहे. याचा एकूण योग होतो ११. अमिताभ ११ हा त्यांचा लकी नंबर मानतात. त्यांचा वाढदिवसही ११ ऑक्टोबरला असतो.
6 / 12
बिग बींन कार्सची फार आवड आहे आणि त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार्स आहेत. त्यांच्याकडे रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी आहे. ही कार त्यांनी कस्टमाइज केली होती. याची सुरूवातीची किंमत साधारण ४९ लाख रूपये आहे.
7 / 12
जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये मिनी कूपर बघितली गेली तेव्हा अफवा उडाली होती की, अभिषेक-ऐश्वर्याने ही कार आराध्याला वाढदिवसाला गिफ्ट केली. पण नंतर अमिताभ यांनी सांगितले होते की, ही कार त्यांना अभिषेकने गिफ्ट केली. या कारची किंमत २६.६ ते २९.९ लाख रूपये दरम्यान आहे.
8 / 12
अमिताभ यांच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा लॅंड क्रूजर कारही आहे. या कारची किंमत १.२० लाख रूपये आहे.
9 / 12
मर्सेडीजची सेडान कारही अमिताभ यांच्या गॅरेजमध्ये आहे. या कारची सुरूवातीची किंमत ५६ लाख रूपये आहे. तसेच त्यांच्याकडे बेंटली कॉन्टीनेंटल GT सुद्धा आहे. या कारची किंमत ४.०४ कोटी रूपये आहे.
10 / 12
अमिताभ बच्चन यांच्या गॅरेजमध्ये आणखीही कार्स आहेत. ज्यात Mercedes SL500, Lexus LX470, BMW X5, BMW 7 Series आणि Mercedes S320 या कार्सचा समावेश करता येईल.
11 / 12
12 / 12
टॅग्स :अमिताभ बच्चनकारबॉलिवूड