Join us

कम्प्युटर महाशय, जयाजी को लॉक किया जाए...! अमिताभ यांनी शेअर केले फोटो, भडकले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 19:09 IST

1 / 8
अमिताभ सध्या केबीसीच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. केबीसीच्या भव्य सेटवरचे शूटींगदरम्यानचे काही फोटो त्यांनी शेअर केलेत आणि त्यांचे हे फोटो पाहून युजर्सनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले.
2 / 8
जया बच्चन यांचे नाव घेत लोकांनी आपला संताप व्यक्त केला.
3 / 8
अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात बॉलिवूड आणि ड्रग्स तस्करी हा मुद्दा उचलून धरला होता. याला समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य केले होते.
4 / 8
ये शर्म की बात है, लोक जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं, असे जया बच्चन राज्यसभेत बोलताना म्हणाल्या होत्या. बॉलिवूडवर होत असलेल्या ड्रग्जच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले होते.
5 / 8
या वक्तव्यानंतर जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. याच अनुषंगाने लोकांनी अमिताभ यांनाही ट्रोल केले.
6 / 8
कम्युटर महाशय, जयाजी को लॉक किया जाए, अशी प्रतिक्रिया एका नेटक-याने दिली.
7 / 8
अन्य एका युजरने अमिताभ यांना सुशांत प्रकरणाची आठवण करून दिली. सर, आत्तापर्यंत तुम्ही सुशांत प्रकरणी एक वाक्यही बोललेला नाहीत, असे युजरने त्यांना सुनावले.
8 / 8
अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये केबीसीचा भव्यदिव्य दिव्य सेट दिसतो आहे. मी 12 ते 14 तास काम करतोय, असेही अमिताभ यांनी हे फोटो शेअर करताना सांगितले आहे.
टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चन