अमिताभ बच्चन यांचं खरं नाव माहितीये का? अनेक वर्षांपूर्वीच केलाय नावात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:43 IST
1 / 8'बिग बी', 'बॉलिवूडचा शहेनशहा', 'मेगास्टार', 'महानायक' अशा असंख्य नावाने ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन.2 / 8गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या अभिनयाच्या जोरावर बिग बी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.3 / 8बॉलिवूडमधील या सदाबहार अभिनेत्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफविषयीदेखील चाहत्यांना बऱ्यापैकी माहित आहे. परंतु, त्यांच्याविषयी एक अशी गोष्ट आहे जी क्वचितच काही जणांना माहित असेल.4 / 8अमिताभ बच्चन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव हे नसून दुसरंच असल्याचं सांगण्यात येतं.5 / 8एका कार्यक्रमात त्यांनी स्वत: त्यांच्या अडनावाचा खुलासा केला होता. 6 / 8अमिताभ बच्चन यांचं खरं अडनाव बच्चन नसून श्रीवास्तव असं आहे. इतकंच नाही तर त्यांचं नावदेखील त्यांनी बदललं आहे. त्यामुळे अमिताभ हेदेखील त्यांचं खरं नाव नाही. 7 / 8बिग बींच्या जन्मापूर्वी त्यांचं नाव इन्कलाब ठेवावं असं घरातल्यांनी ठरवलं होतं. परंतु, जन्मानंतर त्यांचं नाव अमिताभ ठेवण्यात आलं.8 / 8त्यामुळे बिग बींचं खरं नाव इन्कलाब श्रीवास्तव असल्याचं म्हटलं जातं. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याचं सांगण्यात येतं. चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.