1 / 10अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. अमिताभ-जया यांच्या लग्नाला ५२ पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. 2 / 10३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जया लग्नबंधनात अडकले होते. आज या जोडीवर चाहत्यांनी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केलाय. 3 / 10आजही चाहते जया आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.4 / 10जया यांनी लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती. अगदी मिनिमल मेकअपमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.5 / 10हे लग्न त्या काळातील हाय प्रोफाइल लग्नांपैकी एक मानले जात होतं.6 / 10या फोटोमध्ये अमिताभ यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन देखील त्यांच्या मागे बसल्याचे दिसत आहे. 7 / 10जया यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होतं की त्या पहिल्याच नजरेत अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघेही 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.8 / 10फक्त खऱ्या आयुष्यात नाही तर त्यांची जोडी पडद्यावरही हिट ठरली आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.9 / 10अमिताभ यांनी जया बच्चनसोबत पहिला हिट चित्रपट दिला. 'जंजीर' चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. 10 / 10अमिताभ बच्चन आणि जया बच्चन गेल्या ५२ वर्षांपासून एकमेकांना साथ देत आले आहेत. दोघांनी या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले, परंतु कधीही एकमेकांना सोडलं नाही.