1 / 7लय भारी सिनेमातलं आला होळीचा सण लय भारी हे गाणं चांगलंच गाजलं. रितेश देशमुख, जिनिलीया आणि राधिका आपटे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही सर्वांचं फेव्हरेट आहे2 / 7होळी म्हटली की अभिनेत्री संध्या यांच्यावर चित्रित झालेलं जा रे हट नटखट हे होळी विशेष गाणं चांगलंच आठवतं. या गाण्यात संध्या यांनी केलेला डान्स आजही सर्वांच्या लक्षात आहे3 / 7सध्याच्या काळात तरुणाईला आवडणारं गाणं म्हणजे लेट्स प्ले होली. वक्त सिनेमातील हे गाणं होळीचा नवा अंदाज सर्वांसमोर आणतं.4 / 7होली खेले रघुवीरा हे बागबान सिनेमातलं गाणं होळीच्या प्लेलिस्टमध्ये टॉपवर असेल यात शंका नाही. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनींची जोडी प्रचंड गाजली.5 / 7शोले सिनेमातलं होली के दिन दिल खिल जाते है हे सर्वांचं ऑल टाईम फेव्हरेट गाणं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनींचा या गाण्यातील डान्स चांगलाच गाजला. प्रत्येक पिढीला हे गाणं आपलंंसं वाटतं.6 / 7नव्या पिढीची एनर्जी आणि बदलता काळ डोळ्यासमोर ठेऊन वॉर सिनेमातलं जय जय शिवशंकर हे गाणं थिरकायला भाग पाडतं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा जबरदस्त डान्स बघायला मिळतो.7 / 7सिलसिला सिनेमातलं रंग बरसे भिगे चुनरवाली हे गाणं चांगलंच गाजलं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यात सर्वांना आवडते.