दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 17:40 IST
1 / 11बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण, करीना कपूर आणि कंगना राणौत यांची नावं प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्री बी टाऊनच्या सर्वात पॉवरफुल अभिनेत्री मानल्या जातात. या अभिनेत्रींनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले आहेत. आपल्या अदांनी लोकांना घायाळ केलं.2 / 11बॉलिवूडमध्ये एक अशी सौंदर्यवती देखील आहे जिने सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट आहे. आलियाने मुख्य अभिनेत्री म्हणून सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट दिले आहेत.3 / 11मुख्य अभिनेत्री म्हणून आलिया भट्टने 100 कोटींचे सर्वाधिक हिट चित्रपट दिले आहेत. डीएनए इंडियाच्या अहवालानुसार, आलिया भट्ट स्टारर तीन चित्रपटांनी ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे - यामध्ये गंगूबाई काठियावाडी, राझी आणि डिअर जिंदगी यांचा समावेश आहे.4 / 11गंगूबाई काठियावाडीने जगभरात 212 कोटींची कमाई केली होती. राझीचे जगभरातील कलेक्शन 196 कोटी रुपये होते. 'डियर जिंदगी'ने जगभरात 135 कोटी रुपयांची कमाई केली होती.5 / 11आलियाला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. आलिया भट्टनंतर सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत. 6 / 11कंगनाच्या दोन मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांनी ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यापैकी तनु वेड्स मनु रिटर्न्सने जगभरात 255 कोटी रुपये कमावले होते तर मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीने जगभरात 133 कोटी रुपये कमावले होते.7 / 11तापसी पन्नूच्या पिंकने 157 कोटी रुपये आणि सोनम कपूरच्या नीरजाने जगभरात 135.52 कोटी रुपये कमवले होते. आलिया भट्टकडे 'जिगरा' आणि 'लव्ह अँड वॉर' असे दोन उत्तम प्रोजेक्ट आहेत. 8 / 11'द आर्चीज' फेम वेदांग रैनाही 'जिगरा'मध्ये आलियासोबत दिसणार आहे. आलियाचे प्रोडक्शन हाऊस इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन आणि धर्मा प्रोडक्शन मिळून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. 9 / 11वासन बाला दिग्दर्शित हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. लव्ह अँड वॉरमध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 2025 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होण्याची आशा आहे.10 / 1111 / 11