1 / 7मंगळवार, १२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) ला दिमाखात सुरुवात झाली असून, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने पहिल्याच दिवशी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे.2 / 7आलिया भटने कान फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी लाइमलाइट स्वतःकडे खेचून घेतली आहे. तिने पीच रंगाचा 'ऑफ शोल्डर' गाउन परिधान केला होता. आलिया या ड्रेसमध्ये एकदम सुंदर दिसत होती.3 / 7आलियाने या गाउनवर मॅचिंग नेकलेस घालून आपला लूक पूर्ण केला. मोकळे सोडलेले केस आणि दिलखेचक अदा दाखवत आलियाने फोटो आणि व्हिडीओ शूट केलं आहे.4 / 7आलियाने या स्टायलिश गाउनसोबत एक दुपट्टा देखील कॅरी केला होता. रेड कार्पेटवर हा दुपट्टा ती अतिशय आत्मविश्वासाने फ्लॉन्ट करताना दिसली. एकूणच आलियाच्या या लूकची सध्या चांगलीच चर्चा आहे.5 / 7आलियाचा हा खास दुपट्टा ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर तमारा राल्फ यांनी डिझाइन केला आहे, तर आलियाचा हा संपूर्ण लूक रिया कपूरने स्टाईल केला आहे.6 / 7कान्स फेस्टिव्हलला जाण्याआधी आलिया समुद्रकिनारी एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. तिथेही आलियाने खास फोटोशूट करुन चाहत्यांचं प्रेम मिळवलं7 / 7आलिया भटने गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'लव्ह अँड वॉर' आणि 'अल्फा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.