IN PICS: सुपरफ्लॉप!! स्वत:चे हे सिनेमे खुद्द अक्षय कुमारलाही पाहायला आवडणार नाहीत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 15:23 IST
1 / 13सौगंध या सिनेमातून 1991 साली अक्षयने त्याचे फिल्मी करिअर सुरु केले होते. मात्र त्याचा हा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. या सिनेमाने केवळ 3 कोटींची कमाई केली होती.2 / 13याचवर्षी आलेला त्याचा ‘डान्सर’ हा सिनेमाही सुपरफ्लॉप होता. या सिनेमाने कसेबसे 1.5 कोटी रूपयांचा बिझनेस केला होता.3 / 131993 साली आलेला अक्षयचा ‘दिल की बाजी’ दणकून आपटला होता. या सिनेमाने केवळ 85 लाख रूपयांचा बिझनेस केला होता.4 / 131993 याच वर्षांत ‘वक्त हमारा है’ हा अक्षयचा दुसरा सिनेमाही फ्लॉप झाला. या सिनेमाने केवळ 1.9 कोटींची कमाई केली होती.5 / 131994 साली आलेला त्याचा ‘जख्मी दिल’ हा सिनेमाही फ्लॉप ठरला. या सिनेमाने केवळ 90 लाखांची कमाई केली होती. या वर्षी अक्षयचे इक्के पे इक्का, हम है बेमिसाल आणि अमानत हे तीन सिनेमेही रिलीज झाले होते. पण तेही फ्लॉप झाले होते.6 / 131995 साली रिलीज झालेला ‘मैदान ए जंग’ या त्याच्या सिनेमाकडेही लोकांनी पाठ फिरवली होती. या सिनेमाने 3.4 कोटींची कमाई केली होती.7 / 13‘तू चोर मैं सिपाही’ हा 1996 साली आलेला सिनेमाही फ्लॉप ठरला. या सिनेमाने 6 कोटींची कमाई केली होती.8 / 131998 साली अक्षयने ‘बारूद’ हा सिनेमा साईन केला. मात्र हा सिनेमाही फ्लॉप ठरला.9 / 13अक्षय कुमार आज भलेही बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. मात्र 2000 साली आलेला त्याचा ‘खिलाडी 420’ हा सिनेमा सुपरफ्लॉप होता.10 / 132002 साली रिलीज ‘जानी दुश्मन’ हा अक्षयचा सिनेमाही तसाच आपटला होता.11 / 132004 साली आलेला त्याचा ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ त्याच्या सुपरफ्लॉप सिनेमांपैकी एक आहे.12 / 132004 याचवर्षी अक्षयचा ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ हा सिनेमा रिलीज झाला होता. खरे तर हा सिनेमा 1994 साली बनून तयार झाला होता. पण काही कारणाने तो रखडला होता. 2004 मध्ये तो रिलीज झाला आणि सुपरफ्लॉप ठरला.13 / 132012 साली रिलीज झालेला ‘जोकर’ या अक्षयच्या सिनेमानेही प्रेक्षकांची निराशा केली होती.