Join us

रॉयल, क्लासी अन् देसी! ५०० कॅरेट रुबी ज्वेलरी अन् सोन्याचे...ऐश्वर्याच्या Cannes लूकचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:42 IST

1 / 8
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची जगभरात चर्चा सुरु आहे. यंदाचं हे ७८ वं वर्ष आहे. कान्सची राणी म्हणजे OG Indian Queen Of Cannes अशी ओळख असलेली ऐश्वर्या राय बच्चननेही काल कान्समध्ये आपला जलवा दाखवला.
2 / 8
गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या तिच्या फॅशन स्टाईलमुळे ट्रोल होत होती. मात्र यंदाच्या कान्स महोत्सवात ऐश्वर्याने जबरदस्त कमबॅक केलं आहे. हाताने विणलेल्या आयव्हरी बनारसी साडीत ती कमाल दिसत आहे.
3 / 8
कान्समधील ऐश्वर्याचे फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. यंदा ऐश्वर्याचा लूक सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता. भारतीय हस्तकलेचं दर्शन त्याने ऐश्वर्याच्या या लूकमधून घडवलं आहे. विशेष म्हणजे तिने परिधान केलेल्या ज्वेलरीची खास चर्चा होत आहे.
4 / 8
मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, आयव्हरी, रोज गोल्ड आणि चांदीचा वापर करुन हाताने विणलेली ही कडवा आयव्हरी बनारसी साडी आहे. यामागे कारागिरांचं अप्रतिम कौशल्य आहे.
5 / 8
वाराणसीच्या यंत्रमागांच्या माध्यमातून कारागिरांनी प्रत्येक धागा हा स्वतंत्रपणे विणत गुंतागुंतीची प्रक्रिया केली आहे. साडीमध्ये केलेलं भरतकाम अप्रतिम असून खऱ्या चांदीचा वापर करण्यात आला आहे.
6 / 8
तर याच्या पदराचे काठ खऱ्या सोनं आणि चांगीच्या जरदोजी भरतकामाने सजवल्या आहेत. साडी ही जुनी आठवण नाही कर समकालीन पेहराव म्हणून पुन्हा सादर करण्यात आली आहे.
7 / 8
ज्वेलरीबद्दल सांगायचं तर ५०० कॅरेटपेक्षा जास्त असलेला रुबी हिरा आणि १८ कॅरेट सोन्याचे अनकट डायमंड वापरण्यात आले आहेत. हा पाच लेयर वाला रुबी नेकलेस असून यासोबत तिने दोन लेयरचा अनकट जायमंट नेकलेस घातला आहे.
8 / 8
याशिवाय तिने दोन्ही हातात मॅचिंग रुबी आणि डायमंड स्टडेड अंगठ्या घातल्या आहेत. फ्लोरल रिंगच्या मधोमध डायमंड आहे तर चौकोनी रिंगमध्ये हिरे आहेत. एकंदर यामध्ये ऐश्वर्या रॉयल, क्लासी आणि तितकीच देसी लूकमध्ये दिसत आहे.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनकान्स फिल्म फेस्टिवलमनीष मल्होत्रादागिने