Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'नंतर 'हा' भारतीय सिनेमा अचानक पाकिस्तानात गाजतोय, तुम्ही पाहिलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:34 IST

1 / 7
धुरंधर सिनेमा आला आणि भारतासह पाकिस्तानातील लोकांनी हा सिनेमा उचलून धरला. पाकिस्तानात बंदी असूनही हा सिनेमा पायरसीच्या माध्यमातून लोकांनी पाहिला
2 / 7
आता धुरंधरनंतर आणखी एक सिनेमा पाकिस्तानात सध्या चांगलाच गाजतोय. काहीच चर्चा नसताना अचानक हा सिनेमा पाकिस्तानात ट्रेंडिंगवर आला आहे
3 / 7
या सिनेमाचं नाव आहे 'हक'. यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांचा 'हक' हा सिनेमा २०२५ ला रिलीज झाला होता. नुकताच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
4 / 7
ओटीटीवर रिलीज होताlच 'हक' सिनेमा पाकिस्तानातील लोक सुद्धा आवर्जून पाहत असल्याचं समजतंय. इतकंच नव्हे 'हक' सिनेमा पाहून पाकिस्तानी अभिनेत्री सिनेमाचं कौतुक करत आहेत
5 / 7
पाकिस्तानी अभिनेत्री-निर्माती फाजिला काजीने सिनेमा बघून लिहिलंय की, ''या सिनेमाच्या विषयात असलेला गहिरा भाव माझ्या मनाला भिडला आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.''
6 / 7
अशाप्रकारे 'हक' सिनेमाचं चांगलंच कौतुक होताना दिसतंय. विशेष म्हणजे हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा लोकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती.
7 / 7
परंतु 'हक' ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा मात्र सर्वांनी हा सिनेमा उचलून धरला. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा तुम्ही बघू शकता
टॅग्स :यामी गौतमइमरान हाश्मीबॉलिवूडभारतपाकिस्तानधुरंधर सिनेमा