1 / 7'राम-लखन' सिनेमातील 'विविया' आठवतेय? सुभाष घई यांच्या 'राम-लखन' चित्रपटात 'विविया'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनिका गिल आज चंदेरी दुनियेपासून दूर आहे.2 / 7मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ६ वेळा लग्न ठरून मोडल्यानंतर ७ व्या प्रयत्नात तिने संसार थाटला.3 / 7सोनिका गिल मूळची दिल्लीची. ती लहान असतानाच वडिलांनी आईला सोडून लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आईचा संघर्ष पाहून सोनिकाने वडिलांचे नाव लावणे सोडून दिले आणि स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावण्यास सुरुवात केली.4 / 7अभिनय क्षेत्रात संघर्ष करत असताना सोनिकाला सुभाष घई यांना भेटण्याची संधी मिळाली. पहिल्या भेटीतच घई यांनी तिला ५ दिवसांनी घरी बोलावले. सोनिका सांगते की, ते ५ दिवस ५ वर्षांसारखे वाटले होते, पण त्या भेटीत तिने एकाच वेळी ३ चित्रपट साइन केले.5 / 7सोनिकाच्या आयुष्यात लग्नाचा मोठा अडथळा होता. ६ वेळा तिचे लग्न ठरले पण काही ना काही कारणाने ते मोडले. एका पंडिताने तिला मंगळ असल्याचे सांगितले. त्यानंतर घरात विधीवत पूजा करण्यात आली आणि अखेर व्यावसायिक मितेश रुगानी यांच्याशी तिचे लग्न झाले.6 / 7 सोनिका आज मितेश रुगानी यांच्यासोबत सुखी संसार करत आहे. विशेष म्हणजे, सोनिका मितेश यांच्या पहिल्या पत्नीसोबत एकाच घरात राहते. या दोघींमध्ये सख्या बहिणींसारखे किंवा मैत्रिणीसारखे नाते असून त्या आनंदाने एकत्र राहतात.7 / 7सोनिकाला स्वतःची मुलगी आहेच, पण ती मितेश यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांचाही सांभाळ करते. मोठा मुलगा २२ वर्षांचा असून धाकटा १४ वर्षांचा आहे.