Join us

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये होता रोहित शर्मा? म्हणाली- "पहिल्याच भेटीत किस केलं अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:53 IST

1 / 9
भारताचा स्टार कॅप्टन आणि मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. रोहित त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
2 / 9
रोहितचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोफिया हयात हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा दावाही अभिनेत्रीने केला होता.
3 / 9
रोहित आणि सोफिया लंडनमधील एका क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीतच रोहितने किस केल्याचंही सोफियाने म्हटलं होतं.
4 / 9
सोफियाने एका मुलाखतीत रोहित आणि तिच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. रोहित आणि तिचं ब्रेकअप का झालं? याचं कारणही तिने सांगितलं होतं.
5 / 9
'रोहित मला खूप आवडायचा आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळही होतो', असं सोफिया म्हणाली होती.
6 / 9
'आमच्यात सगळं काही नीट सुरू होतं. पण, मीडियाशी बोलताना रोहितने माझी ओळख करून देताना मी केवळ तिचा चाहता असल्याचं म्हटलं'.
7 / 9
'त्याच्या बोलण्याने मी दुखावले. तेव्हापासूनच आमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला'.
8 / 9
'मी तेव्हापासून त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. आणि त्याचा नंबरही डिलीट केला', असं सोफियाने सांगितलं होतं. पण, सोफियासोबतच्या नात्याबाबत रोहितने मौन बाळगणं पसंत केलं.
9 / 9
दरम्यान, सोफियाने २०१७ मध्ये १० वर्षांनी लहान असलेल्या इंटीरियर डिझायनर व्लाड स्टॅनेस्कूशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.
टॅग्स :रोहित शर्माआयपीएल २०२४मुंबई इंडियन्ससेलिब्रिटी