Join us
Daily Top 2Weekly Top 5

Facebook फोटोमुळे मिळाला पहिला सिनेमा अन् नशीब पालटलं! आज 'ही' अभिनेत्री करोडोंची मालकीण

By देवेंद्र जाधव | Updated: March 3, 2026 13:54 IST

1 / 7
कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. एका फेसबुक फोटोमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं नशीब बदललं आणि तिला थेट सिनेमाची ऑफर मिळाली. आज ही अभिनेत्री बॉलिवूडची आघाडीची कलाकार आहे.
2 / 7
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रद्धा कपूर. हो तुम्ही बरोबर वाचताय. एका फेसबुक फोटोमुळे श्रद्धाला बॉलिवूडचा पहिला सिनेमा मिळाला होता.
3 / 7
श्रद्धा कपूर तेव्हा अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राचे (Psychology) शिक्षण घेत होती. तेव्हा तिने तिचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले होते.
4 / 7
निर्माती अंबिका हिंदुजा त्यावेळी एका सिनेमासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होती. तिला श्रद्धाचे काही फोटो फेसबुकवर दिसले आणि तिने श्रद्धाच्या भावाशी संपर्क साधला
5 / 7
पुढे श्रद्धाला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. श्रद्धाने त्यावेळी सायकोलॉजीच्या पहिल्या वर्षाला होती. परंतु सिनेमात नशीब आजमवण्याच्या उद्देशाने श्रद्धा शिक्षण सोडून मुंबईत आली.
6 / 7
त्यानंतर श्रद्धा कपूरला तीन पत्ती सिनेमासाठी निवडण्यात आलं. २०१० साली हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात श्रद्धासह अमिताभ बच्चन, आर. माधवन अशी तगडी स्टारकास्ट होती.
7 / 7
श्रद्धा कपूर सध्या बॉलिवूडची आघाडीची हिरोईन आहेच शिवाय ती करोडोंची मालकीण आहे. श्रद्धा आता आगामी ईठा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडशक्ती कपूरफेसबुकसोशल मीडिया