1 / 8 'विधायें', 'डर', 'दुश्मन', 'बाजीराव मस्तानी', 'थप्पड' आणि 'त्रिभंगा' या चित्रपटांसह 'जीवनरेखा', 'मिर्झा गालिब', 'कहकशान' 'फॅमिली नं. 1 या मालिकांमधून भूमिका साकारणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे तन्वी आझमी.2 / 8 तन्वी आझमी यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६० रोजी लोकप्रिय मराठी-हिंदी अभिनेत्री आई उषा किरण आणि वडील डॉ. मनोहर खेर यांच्या सुप्रसिद्ध कुटुंबात झाला. 3 / 8आईमुळे त्यांना अभिनयाची तीव्र आवड निर्माण झाली आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.4 / 8 तन्वी आझमी यांची मनोरंजन क्षेत्रातील कारकीर्द १९८५ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते बापू दिग्दर्शित 'प्यारी बेहना' या चित्रपटातून सुरू झाली. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, विनोद मेहरा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं.5 / 8छोट्या पडद्यावर त्यांनी बरंच काम केलं.'जीवनरेखा' या मालिकेत त्यांनी साकारलेल्या त्रासलेल्या डॉक्टरची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच १९९१ मध्ये प्रमुख कवींच्या जीवनावर आधारित असलेल्या जलाल आगा दिग्दर्शित 'कहकशान' या मालिकेतही त्यांनी आपल्या कामाने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.6 / 8 'बाजीराव मस्तानी '(२०१५) या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी पहिल्या बाजीरावची आई राधाबाईंची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होण्यासोबतच त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच रितेश देशमुखच्या लयभारी सिनेमातही त्या झळकल्या. 7 / 8 तन्वी यांनी आजवर विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं आहे. 8 / 8परंतु अनेकांना माहित नसेल, वैयक्तिक जीवनात तन्वी आझमी यांनी प्रसिद्ध छायाचित्रकार आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचे भाऊ बाबा आझमी यांच्याशी विवाह केला आहे.शबाना आझमी या त्यांच्या नणंदबाई आहेत.