Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच अदा,तेच मनमोहक सौंदर्य; हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आजही दिसतात तितक्याच सुंदर, आता काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:20 IST

1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सौंदर्य आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असणाऱ्या अभिनेत्रींचा उल्लेख करायचा झाला तर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचा नामोल्लेख आवर्जून करावा लागेल.
2 / 7
१ नोव्हेंबर १९६५ रोजी मुंबईत जन्मलेल्या पद्मिनी यांचा बालपणापासूनच संगीताशी घट्ट संबंध होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ कोल्हापुरे, जे एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि वीणावादक म्हणून ओळखले जायचे. अशा कलेच्या वारसा लाभलेल्या घरात जन्मल्याने पद्मिनी यांना बालपणी संगीतात प्रचंड रस होता.
3 / 7
अभिनय क्षेत्राय येण्यापूर्वी पद्मिनी कोल्हापूरे यांनी काही चित्रपटांसाठी गायन केलं. यादों की बारात’ आणि ‘किताब’ या चित्रपटांसाठी त्यांनी गायन केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांची बहीण शिवांगी कोल्हापूरे या यांचा त्या आवाज बनल्या.
4 / 7
वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐसा प्यार कहाँ या सिनेमाने त्यांचं नशीब पालटलं.याचदरम्यान, राज कपूर यांनी त्यांना आपल्या चित्रपट ‘प्रेम रोग’मध्ये मुख्य भूमिकेसाठी साइन केले, आणि हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
5 / 7
यानंतर त्यांनी ‘प्यार झुकता नहीं’, ‘विधाता’, ‘वो सात दिन’, ‘स्वर्ग से सुंदर’ आणि ‘आहिस्ता-आहिस्ता’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय मराठीतही त्यांनी काम केलं आहे. चिमणी पाखरं सारखा यशस्वी सिनेमा त्यांच्या नावावर आहे.
6 / 7
ऐसा प्यार कहाँ या सिनेमाच्या सेटवर पद्मिनी आणि प्रदीप यांची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. वयाच्या २१ व्या वर्षी पद्मिनी यांनी प्रदीपसोबत लग्न करायचा निर्णय घेतला.आज पद्मिनी कोल्हापुरे जरी चित्रपटसृष्टीत क्वचित दिसत असल्या, तरी त्यांचे नाव अजूनही हिंदी सिनेमातील सर्वाधिक सशक्त अभिनेत्रींच्या यादीत गणलं जातं.
7 / 7
त्या हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावर त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अपडेट्स तसेच वेगवेगळे फोटो, व्हिडीओज शेअर करत असतात. एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्यांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही नायिका आजही तितकीच सुंदर दिसते.
टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरेबॉलिवूडसेलिब्रिटीव्हायरल फोटोज्सोशल मीडिया