अंडरवर्ल्डच्या भीतीने रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाली ही हिरोईन, डॉन तिच्या बोल्डनेसवर झाला होता फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 16:13 IST
1 / 9बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असतात जे कमी काळात यशाचं शिखर गाठतात. पण यातील काहीच असे असतात जे आयुष्यभर आपलं स्टारडम टिकवून ठेवू शकतात. अशीच एक अभिनेत्री होती जिने आपल्या बोल्डनेसने फॅन्सना वेड लावलं होतं. पण ती रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाली. ती आता कुठे आहे काही पत्ता नाही. ती म्हणजे अभिनेत्री म्हणजे जॅस्मिन.2 / 9जॅस्मिन 1988 मध्ये आलेल्या हॉरर 'वीराना' सिनेमात दिसली होती. यातील तिच्या बोल्ड लूकने ती खूप फेमस झाली होती. पण तिचं हे सुंदर दिसणंहीच तिचं गायब होण्याचं कारण ठरलं.3 / 9जॅस्मिनच्या सुंदरतेवर तेव्हाचा एक अंडरवर्ल्ड डॉनही फिदा झाला होता. ज्याला वैतागून जॅस्मिन रातोरात गायब झाली. जॅस्मिन गायब होऊ अनेक वर्ष झालीत. आज तिचा काहीच पत्ता नाही.4 / 9मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅस्मिन अंडरवर्ल्ड डॉनला इतकी वैतागली होती की, तिने नेहमीसाठी देश सोडला. अनेक वर्ष झाली तरी आजपर्यंत जॅस्मिनची काहीच खबर नाही. 5 / 9काही लोक म्हणतात की, जॅस्मिन अमेरिकेत स्थायीक झाली तर काही म्हणतात की, तिने लग्न केलं आणि जॉर्डनमध्ये शिफ्ट झाली. तिला सोशल मीडियावर शोधण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला. पण ती काही सापडली नाही.6 / 9जॅस्मिनबाबत वीराना सिनेमाचे डायरेक्टर श्याम रामसे वक्तव्य केलं होतं. ते एका मुलाखतीत म्हणाले होते की, जॅस्मिन मुंबईतच राहते आणि ती ठीक आहे. जॅस्मिनने आपल्या आईच्या मृत्यूनंतर सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला होता.7 / 9 श्याम रामसे म्हणाले होते की, वीराना 2 बनवण्याचा ते विचार करत आहेत आणि त्यात ती जॅस्मिनला नक्की कास्ट करतील. पण 2019 मध्ये श्याम रामसे यांचं निधन झालं. त्यानंतर वीराना 2 काही बनली नाही आणि जॅस्मिन समोर आली नाही.8 / 9असं म्हटलं जातं की, जॅस्मिन इंडस्ट्रीमध्ये कुठून आली होती याची कुणाला माहिती नव्हती. ना तिच्या परिवाराबाबत कुणाला माहीत होतं. ती आधी काय करत होती हेही कुणाला माहीत नव्हतं. 9 / 9असंही म्हटलं जातं की, जॅस्मिनचं खरं नावही कुणाला माहीत नाही. बोल्ड भूमिकेमुळे तिने तिचं नाव जॅस्मिन ठेवलं होतं. वीरानानंतर जॅस्मिनने अनेक हॉरर सिनेमे जसे की, 'बंद दरवाजा', 'डाक बंगला' आणि 'पुरानी हवेली' यातही कामे केली होती.