Join us
Daily Top 2Weekly Top 5

"खरं सांगायचं तर..."; धनुषसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांदरम्यान मृणाल ठाकूरचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:13 IST

1 / 7
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृणाल ठाकूर आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. एका सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान मृणालने धनुषला बोलावल्याने आणि दोघांमधील वाढती मैत्री पाहून मृणाल - धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पसरल्या.
2 / 7
मृणालला अनेकदा यावर प्रश्न विचारण्यात आला. परंतु तिने मात्र मौन बाळगणे पसंत केले. याशिवाय या चर्चा हसण्यावारी नेल्या. आता अनेक महिन्यांनंतर धनुषने अवघ्या काही वाक्यांत डेटिंगच्या या चर्चांवर त्याचं मत व्यक्त केलंय.
3 / 7
परंतु नुकत्याच एका मुलाखतीत तिने या चर्चांवर तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मृणाल म्हणाली- मी माझ्या सिनेमांतील कामासाठी ओळखलं जावं. 'ती कोणाला डेट करतेय?' अशा गोष्टींसाठी मला ओळखलं जाऊ नये.
4 / 7
''खरं सांगायचं तर माझ्याकडे डेटिंगसाठी वेळच नाहीये. माझ्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली आहे. एक्सरे काढल्यानंतर मला पुढील उपचारांसाठी जायलाही वेळ मिळालेला नाही. मग वैयक्तिक आयुष्यात डेटिंग वगैरेचा विचार तर सोडाच.', अशा स्पष्ट शब्दांत मृणालने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
5 / 7
१४ फेब्रुवारी २०२६ ला मृणाल आणि धनुष एकमेकांशी लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. इतकंच नव्हे दोघांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं अशीही बातमी समोर आली.
6 / 7
परंतु मृणाल आणि धनुषने आजवर या चर्चांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कायमच मौन बाळगलं आणि कोणताही खुलासा केला नाही. दोघांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांना कौतुक असलं तरीही त्यांच्या डेटिंगच्या चर्चा मात्र थांबत नव्हत्या.
7 / 7
आता मृणालने स्वतः हे सांगितल्याने आता तरी तिच्या आणि धनुषच्या लग्नाच्या चर्चा बंद होतील, अशी सर्वांना आशा आहे. धनुषनेही मीडियात कधीच या गोष्टीचा उल्लेख केला नाही. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, मृणाल नुकतीच डकैत या हिंदी सिनेमात झळकत आहे. तर धनुष सध्या ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये झळकत आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूरधनुषबॉलिवूड