Join us

लग्नाआधी ब्लड कॅन्सरचं निदान! कधीच होऊ शकणार नाही आई, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:03 IST

1 / 7
२००१ साली आलेला 'कसूर' सिनेमा सर्वांना माहित असेलच. या सिनेमातून लिसा रे या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2 / 7
लिसा रे सध्या सिनेमांमध्ये काम करत नसली तरीही ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी लिसाने तिच्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता.
3 / 7
लिसा रेला लग्नाआधी ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. यामुळे तिला आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार आहेत.
4 / 7
याच कारणामुळे लिसा कधीही आई होऊ शकणार नाही, याचा खुलासा तिने केला होता. कॅन्सरवर करत असलेल्या उपचारांमुळे लिसाची प्रजनन क्षमता कमी झाली.
5 / 7
लिसाने पुढे सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याचा निर्णय तिने घेतला. या निर्णयाला तिच्या पतीनेही सपोर्ट केला.
6 / 7
२०१८ साली लिसा सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. लिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या जुळ्या मुलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.
7 / 7
लिसा सध्या अभिनय क्षेत्रात सक्रीय नाही. लिसाने 'कसूर', 'वॉटर', 'हसते खेलते', 'नेताजी', 'वीरप्पन' अशा हिंदी-साउथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय
टॅग्स :लिजा रेबॉलिवूडआफताब शिवदासानी