३ मुलांच्या वडिलांशी केलं लग्न, ७ वर्षात घटस्फोट; अभिनय सोडून बिझनेस करतेय 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:02 IST
1 / 9'मोहोब्बते' मधली अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आठवतेय? गेल्या १४ वर्षांपासून किम सिनेसृष्टीपासून दूर आहे. २०११ साली ती शेवटची सिनेमात दिसली होती. 2 / 9किम शर्मा आज ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने १५ व्या वर्षांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली. १९९३ साली शाहरुख खानच्या 'डर' सिनेमात ती छोट्या भूमिकेत होती.3 / 9यानंतर किमने 'मोहेब्बचे','तुमसे अच्छा कौन है','कहता है दिल बर बार','फिदा','टॉम डिक अँड हॅरी','मनी है तो हनी है' या काही सिनेमांमध्ये काम केलं.4 / 9तिने काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं. आयटम नंबर्स केले. मात्र तिला यश मिळत नव्हतं. म्हणून २०११ नंतर तिने अभिनय सोडून बिझनेस क्षेत्रात एन्ट्री घेतली.5 / 9किमने डीसीए टॅलेंट एजन्सीत एक्झिक्युटिव्ह वाइस प्रेसिडेंट पदावर काम केलं. तिच्या लिंक्डइन प्रोफाईल वरुन ही माहिती मिळते. २०१० साली किमने बिझनेसमध्ये यायचं ठरवलं. तिने पूर्व आफ्रिकेत अनेक हॉटेलही चालवले. तेव्हा तिला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रस आला.6 / 9यानंतर तिने दुबईत ब्राइडल इमेज अँड कन्सल्टन्सी सेटअप केला आणि नंतर भारतातही ब्रांच सुरु केली. ती सध्या ITW Playworx मध्ये वाइस प्रेसिडंट आहे.7 / 9२०१० सालीच किमने केन्यातील बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं होतं. २०१७ साली त्यांचा घटस्फोट झाला. अलीचे विवाहबाह्य संबंध होते. दुसऱ्या महिलेसाठी त्याने किमला सोडलं. 8 / 9अली पुंजानी किमशी लग्न करण्याच्या आधीही विवाहित होता. त्याने पत्नीला घटस्फोट देऊन किमशी लग्न केलं. त्याला पहिल्या पत्नीपासून ३ मुलं आहेत.9 / 9यानंतर किमने फॅशन डिझायनर अर्जुन खन्ना, अभिनेता हर्षवर्धन राणेपासून ते युवराज सिंह, लिएंडर पेस या खेळाडूंनाही डेट केलं आहे.