सुंदर अभिनेत्री आजही चांगल्या संधीच्या शोधात, वयाच्या चाळीशीत डिप्रेशनमध्ये गेली; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:41 IST
1 / 9मनोरंजनविश्वात अनेकदा काम न मिळाल्याने कलाकार डिप्रेशनचा सामना करतात. तीव्र स्पर्धा, फेवरेटिझम, गटबाजी यामुळे कित्येकांना संधीच मिळत नाही.2 / 9अशीच एक अभिनेत्री जी बराच काळ नैराश्यात होती. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षांवर खरी न उतरल्याने ती निराश झाली होती. तसंच चुकीच्या संगतीमुळे तिचं आयुष्य खराब होत होतं.3 / 9ही अभिनेत्री आहे अहाना कुमरा. 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आल होती. नुकतंच एका मुलाखतीत ती म्हणाली, 'हे सगळं काही अचानक घडलं नव्हतं. हळूहळू या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या. मी तेव्हा स्वत:ला जगापासून दूर ठेवलं होतं.'4 / 9'खाली डोकं करुन काम करत राहा असं मी स्वत:ला समजवायचे. मला वाटतं माझं कामच माझी सर्वात मोठी शक्ती बनलं. माझ्याकडे इतरही अनेक प्लॅन होते.'5 / 9'एखादी गोष्ट नाही मिळाली तर दुसरी मिळेल अशी मला खात्री होती. प्रत्येक गोष्टीत मी वाईट नसेल, कुठेतरी मी चांगली असेल असा मला विश्वास होता.'6 / 9'आजही माझा प्रवास सोपा नाही. सतत प्रयत्न केल्याने मला माझ्या क्षमतांवर विश्वास बसला. मी एक चांगली अभिनेत्री आहे हे मला कायम माहित होतं. आजही संधी कमीच येतात आणि अनेकदा ज्या भूमिका ऑफर होतात त्या फारशा ताकदवान नसतात.'7 / 9'मला ज्या दिग्दर्शकांसोबत काम करायची इच्छा आहे ती संधी अजूनही मिळालेली नाही. पण नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल असा मला विश्वास आहे.'8 / 9'आता माझा एकच मंत्र आहे - कधीही हार मानायची नाही. ना स्वत:हून, ना कामापासून आणि ना आयुष्यातून. मी आयुष्यात जे सहन केलंय त्यावरुन मी हेच शिकले की प्रयत्न कधीही सोडू नये.'9 / 9'आता मी नवीन लोकांना भेटायला, नव्या गोष्टी करायला आणि स्वत:च्या जगातून बाहेर यायला घाबरत नाही. मला माहित आहे की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलंच होणार आहे.'