पहिल्यांदाच ट्रेलर लाँचमध्ये दिसला खरा घोडा; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाच्या इव्हेंटची चांगलीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:41 IST
1 / 7अजय देवगणच्या आगामी 'आझाद' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला पहिल्यांदाच घोडा दिसला2 / 7'आझाद' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला सिनेमातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती3 / 7'आझाद'च्या ट्रेलर लाँचला अजय देवगणने पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची लेक राशा थडानीसोबत खास फोटोशूट केलं.4 / 7कलाकारांनी ब्लॅक थीममध्ये केलेलं फोटोशूट सर्वांच्या पसंतीस पडलं. 'आझाद' सिनेमातून राशा थडानी आणि अमन देवगण पदार्पण करत आहेत5 / 7पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलर लाँचला एका घोड्याने हजेरी लावली होती. यावेळी घोड्यासोबत सिनेमातील कलाकारांनी फोटोशूट केलं6 / 7सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी अजय देवगण, अमन देवगण आणि राशा थडानीसोबत खास फोटो काढले7 / 7'आझाद' सिनेमातील हा सुंदर घोडा सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. 'आझाद' सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज होतोय