Join us

Anu Aggarwal : 'आशिकी गर्ल' अनु अग्रवालनं लग्न का केलं नाही? म्हणाली...'प्रेम जडलं होतं पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:54 IST

1 / 13
1990 साली आलेल्या ‘आशिकी’ या चित्रपटाच्या हिरोईनचा गोड चेहरा आजही डोळ्यांपुढे येतो. तिचं नाव अनु अग्रवाल. अर्थात एका अपघाताने तिचा अख्खा चेहरामोहराच बदलला..
2 / 13
अनु अग्रवाल 53 वर्षांची झाली आहे आणि आजही सिंगल आहे. एका मुलाखतीत ती आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलली.
3 / 13
अनु सुद्धा एकेकाळी प्रेमात होती. तिचा बॉयफ्रेन्ड होता. हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण हे नातं लग्न होण्याआधीच संपलं.
4 / 13
ती म्हणाली, माझा बॉयफ्रेन्ड होता. पण एका मोठ्या कारणानं आमचं नातं मोडलं. बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप झालं आणि यातून मी खूप काही शिकले.
5 / 13
ती म्हणाले, त्या ब्रेकअपनंतर माझे डोळे उघडले. मी बाहेर प्रेम शोधत होते, पण मला ते माझ्या आत शोधायला हवं होतं. यानंतर मी स्वत:वर प्रेम करू लागले.
6 / 13
मी त्याच्यावर स्वत:पेक्षाही प्रेम केलं होतं. माझं त्याच्यावर अतोनात प्रेम होतं आणि कदाचित हीच सर्वात मोठी समस्या होती, असंही ती म्हणाली.
7 / 13
मला हिरोईन बनण्यात काहीही रस नव्हता. 90 च्या दशकात महिलांना ज्या भूमिका दिल्या जायच्या, त्या मला जराही आवडत नसत. सुंदर दिसा, दोनचार गाणी गा आणि रडा असं सगळं त्या हिरोईनच्या वाट्याला यायचं, म्हणून मला हिरोईन बनण्याचं नव्हतं, असं तिने सांगितलं.
8 / 13
ती म्हणाली, आशिकी करायलाही मी कचरत होते. भूमिका हेच कारण होतं. पण नंतर मला कळलं की मी एका अनाथ मुलीची भूमिका साकारतेय, जिला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. म्हणून मग मी या सिनेमाला होकार दिला.
9 / 13
‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली.
10 / 13
अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. कुणीतरी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं.
11 / 13
या अपघातानंतर अनु जवळपास 29 दिवस कोमात गेली. इतकंच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली. सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदललं होतं.
12 / 13
भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली.
13 / 13
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड