By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:21 IST
1 / 8 ‘ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता…’ हे गाणं तुम्हाला आठवतंय का? १९९३ मध्ये रिलीज झालेल्या या ‘ऑंखे’ या चित्रपटातील गाणं आजही ऐकताना तितकंच श्रवणीय वाटतं. 2 / 8 बॉलिवूड अभिनेता गोविंदाची आणि रितू शिवपूरी यांच्यावर हे गाणं चित्रित केलं गेलं होतं. या चित्रपटात गोविंदासोबत स्क्रीन शेअर करून अभिनेत्री रितू शिवपूरी हे नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं होतं. मात्र, ही अभिनेत्री आता कुठे आहे, काय करते जाणून घेऊया...3 / 8 अभिनेत्री रितू शिवपूरीचा जन्म २२ जानेवारी १९७५ साली मुंबईत झाला. रितू ही अभिनेते ओम शिवपूरी आणि सुधा शिवपुरी यांची मुलगी आहे.4 / 85 / 8 रितू शिवपुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तिने सगळ्याचं लक्ष स्वत:कडे वेधलं होतं. तिच्या सौंदर्याचीही तितकीच चर्चा झाली. त्यावेळी अनेक लोक तिची तुलना करिश्मा कपूरशी करायचे. अभिनेत्री रितू शिवपुरी थोडीफार करिश्मा कपूरप्रमाणे दिसत असल्याने तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती.6 / 8 त्यानंतर रितूसाठी चित्रपटसृष्टीचे दार खुले झाले. रितूने तिच्या फिल्मी कारकिर्दीत 'आर या पार', 'हम सब चोर हैं', 'भाई भाई', काला साम्राज्य, 'लज्जा, शक्ति-द पॉवर', 'ऐलान' आणि 'एक जिंदगी एक जान', 'रॉक डांसर', 'ग्लैमर गर्ल', 'हद कर दी आपने' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. इतकंच नाहीतर दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील ती झळकली.7 / 8 मात्र,सगळं काही सुरळीत असताना तिने तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि ती रितू टीव्ही मालिकांमध्ये काम करू लागली. 'इस प्यार को क्या नाम दूं 3', 'विश', 'नजर' आणि 'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' सारख्या टीव्ही मालिंकामध्येही ती झळकली.8 / 8 यानंतर रितू शिवपूरी इंडस्ट्रीपासून दुरावली. रितूने वैयक्तिक आयु्ष्यात व्यावसायिक हरी व्यंकट यांच्याशी लग्न केलं. यानंतर तिने दागिने डिझाइनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.सध्या रितू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्यावर आपले ग्लॅमरस फोटो, फॅशन इव्हेंट्स आणि कामाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांना देत असते.