बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:35 IST
1 / 10बोल्ड फॅशन चॉईससाठी प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेदने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनेत्रीने स्वतःबद्दलच पुन्हा एकदा एक धक्कादायक खुलासा केला आहे.2 / 10उर्फीच्या 'बंक विथ उर्फी' या टॉक शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अंशुला कपूर गेस्ट म्हणून आली होती. याच दरम्यान उर्फीने सांगितलं की, तिला बॉडी डिसमॉर्फिया (स्वतःच्या शरीराकडे चुकीच्या पद्धतीने पाहण्याचा मानसिक आजार) आहे.3 / 10उर्फीने सांगितलं की, यामुळे तिने खाणं-पिणं जवळजवळ बंद केलं होतं. 'मी ३-४ वर्षांपूर्वी बॉडी डिसमॉर्फियाचा सामना करत होते. मी स्वतःला उपाशी ठेवायची. मी खाणं बंद केलं होतं.'4 / 10'मला खूप बारीक व्हायचं होतं, म्हणून मी जेवण करणं सोडून दिलं होतं. मी दिवसाला फक्त ३-४ चिकनचे पीस खात असे. मी व्यायामही करत नव्हती.'5 / 10'मी फक्त धावत राहायची, यामुळे वजन लवकरात लवकर कमी होईल असा विचार करायची' असं उर्फी जावेदने म्हटलं आहे. 6 / 10अभिनेत्रीने कबूल केलं की स्वतःला सडपातळ बनवण्याच्या प्रक्रियेत ती मानसिकदृष्ट्या खचली होती. 'मी भावनिकदृष्ट्या तुटलेली होते. मी चिडचिडी झाली. सतत रागात असायची.'7 / 10'जर कोणी माझ्याशी बोलायला आलं तर मला खूप राग यायचा. मी ओरडून म्हणायचे - तुम्ही माझ्याशी का बोलत आहात?'8 / 10'आता माझी प्रकृती उत्तम आहे. अलीकडेच मी जिमला जायला सुरुवात केली आहे. मी वेटलिफ्टिंग देखील सुरू केलं आहे.'9 / 10'मी सकस आहार खायला सुरुवात केली आहे. आता मला बारीक दिसण्याची काळजी नाही' असं देखील उर्फी जावेदने म्हटलं आहे. 10 / 10उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती चर्चेत राहण्यासाठी नेहमीच विचित्र कपडे घालून हटके फॅशन करत असते.