Join us  

बॉलिवूड खलनायकाच्या लेकीचीच सोशल मीडियावर चर्चा, हिच्यासमोर अभिनेत्रीही दिसतील फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 1:46 PM

1 / 9
बॉलिवूडमध्ये कोणा खलनायकाच्या अभिनयाच्या चाहते प्रेमात पडले असतील तर ते म्हणजे अमरीश पुरी(Amrish Puri). मिस्टर इंडिया असो गदर असो किंवा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका लोकांना लक्षात राहिली. सध्या त्यांची लेक चर्चेत आली आहे.
2 / 9
अमरीश पुरी यांचे वैयक्तिक आयुष्य फारसं समोर आलं नाही. सध्या त्यांच्या लेकीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कोण आहे बॉलिवूडच्या खलनायकाची लेक माहितीए का?
3 / 9
त्यांची मुलगी ही अभिनय क्षेत्रात नाही पण यशस्वी बिझनेस वुमन आहे. मात्र लुक्समध्ये ती अभिनेत्रींनाही मात देईल अशी आहे.
4 / 9
तिचे नाव आहे नम्रता पुरी (Namrata Puri). नम्रता लाईमलाईटपासून नेहमीच दूर असते मात्र ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कायम अॅक्टिव्ह असते.
5 / 9
नम्रताचा वुमन्स फॅशन ब्रॅंड आहे. तिचे स्वत:चे फोटो हे कोणत्याही मॉडेल पेक्षा कमी नाही हे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर समजेल.
6 / 9
नम्रता सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे. मात्र फॅशन डिझायनिंगमध्येच तिला जास्त आवड आहे. सध्या ती त्याच क्षेत्रात काम करते. इंडस्ट्रीतही ती फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे.
7 / 9
नम्रता खूपच स्टायलिश आणि लक्झरीअस आयुष्य जगते. तिच्या ब्रॅंडचे अनेक राज्यात स्टोअर्स आहेत. तिला व्यवसायात उत्तम प्रतिसादही मिळतो.
8 / 9
नम्रता मुंबईत जन्माला आली आहे. ती ३८ वर्षांची असून फोटोंवरुन तिच्या वयाचा अंदाजही लागणार नाही.
9 / 9
नम्रता शिरीष बागवेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. शिरीष फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत आहे.
टॅग्स :अमरिश पुरीपरिवारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्