Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कैलासमध्ये भगवान शिवसोबत असेल SSR...; सुशांतसिंह राजपूतच्या जन्मदिनानिमित्त बहिण श्वेता सिंहची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:16 IST

1 / 8
Sushant Singh Rajput Birth Anniversary: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूला २ वर्ष उलटली तरी त्याच्या मृत्यूवरील संशय आजही कायम आहे. आज सुशांतसिंहचा जन्मदिन आहे. या पार्श्वभूमिवर त्याची बहिण श्वेताना सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
2 / 8
​​आज सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिन आहे. सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सुशांतसिंहचे दोन न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
हे फोटो शेअर करताना त्यांनी आपल्या भावासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. या फोटोंमध्ये दिवंगत सुशांत त्याच्या भाचीसोबत बेडवर खेळताना दिसत आहे.
4 / 8
एका फोटोत त्याची भाची त्याच्या गालावर चुंबन घेत आहे, तर दुसर्‍या फोटोत सुशांत दंगा करताना दिसत आहे. सुशांत बेडवर पडलेला आहे. श्वेताच्या या पोस्टवर सुशांतचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
5 / 8
श्वेता सिंह किर्ती यांनी पोस्ट फोटो शेअर करत लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माझा क्यूट सा गोड सा भाऊ…. तुम्ही कुठेही असाल, नेहमी आनंदी राहा. तुम्ही कैलासात शिवजींसोबत असाल अशी माझी भावना आहे.
6 / 8
आम्ही तुमच्यावर असीम प्रेम करतो. अनंत शक्ती पर्यंत. जेव्हा तुम्ही खाली पहाल तेव्हा तुम्हाला तुमची विखुरलेली जादू दिसेल. तू अनेक सुशांतला जन्म दिला आहेस.
7 / 8
“ सुशांतकडे तुमच्यासारखे सोन्याचे हृदय आहे. मला तुझा अभिमान आहे बाळा आणि नेहमीच असेल.' श्वेताने हॅशटॅगसह सुशांत डे आणि सुशांत मून लिहिले.
8 / 8
श्वेताच्या या पोस्टवर सुशांतचे चाहते कमेंट करत आहेत आणि त्यांच्या आवडत्या दिवंगत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. वरती बसलेला सर्व पाहत आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड