Shah Rukh Khan : "मी अर्धा अनाथ आणि आउटसायडर ..."; असं का म्हणाला शाहरुख खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:41 IST
1 / 9अभिनेता शाहरुख खानने खूप संघर्षानंतर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं, आज या सुपरस्टारचे फक्त देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. मात्र या अभिनेत्याने स्वत:ला अर्धा अनाथ आणि आउटसायडर म्हणून सर्वांना धक्का दिला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...2 / 9वॉल्ट डिस्ने स्टुडिओ इंडियाने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख मुफासा: द लायन किंगबद्दल बोलला आहे. यामध्ये त्याने मुफासाला आवाज दिला. 3 / 9याच दरम्यान, अभिनेत्याने सांगितलं की, त्याची खऱ्या आयुष्याची गोष्टही मुफासाच्या कथेशी जुळते. त्याने स्वत:ला अर्धा-अनाथ आणि इंडस्ट्रीमध्ये आउटसायडर असं म्हटलं आहे. 4 / 9क्लिपमध्ये शाहरुख म्हणाला, 'जर मी नम्र नसतो आणि म्हणालो असतो, 'हो, माझी कथा अशी आहे' तर ते फिट झालं असतं. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर, ज्यांचे आई-वडील नाहीत ते अनाथ आहेत. मी तरुण असताना माझे आई-वडील गमावले आहेत, म्हणून मी अर्धा अनाथ आहे.'5 / 9शाहरुख खान १५ वर्षांचा असताना त्याचे वडील मीर ताज मोहम्मद यांचं निधन झालं. अभिनेत्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी त्याची आई लतीफ फातिमा खान यांचंही निधन झालं.6 / 9तो पुढे म्हणाला, 'ही एका आउटसायडरची गोष्ट आहे, माझ्या कुटुंबातील कोणीही चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात नाही. मी दिल्लीहून मुंबईत आलो, त्यामुळे मी देखील एक आउटसायडर आहे. ही किंगची गोष्ट आहे, म्हणून होय, मी एक राजा आहे.' 7 / 9आउटसायडर असण्यावर शाहरुख खान म्हणाला की, 'आउटसायडर असणं खूप भीतीदायक आहे. शाहरुख मुफासाबद्दलही बोलला. तो म्हणाला, 'मला वाटतं त्याग, मैत्री आणि निष्ठा यांची ही एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे.'8 / 9'मी चित्रपट डब करत असताना खूप भावना होत्या. मला वाटलं, 'तो किती छान आहे, किती छान पात्र आहे.' डिस्नेच्या आगामी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये शाहरुखने मुफासाला आपला आवाज दिला आहे. 9 / 9मुलगा आर्यन खान सिंबाला आवाज दिला आणि अबराम तरुण मुफासाचा आवाज आहे. इतर आवाजांमध्ये पुम्बाच्या भूमिकेत संजय मिश्रा, टिमॉनच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि टाकाच्या भूमिकेत मियांग चांग यांचा समावेश आहे.