PHOTOS : श्रद्धा कपूर सिंगल आहे का? अभिनेत्रीची 'मन की बात', थेट भाष्य करत सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 19:27 IST
1 / 11बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. स्टारकीड असल्याने तिला स्वत:ची ओळख बनवायला फार वेळ लागला नाही. मात्र, असे असताना देखील अनेकदा बॉलिवूडमध्ये गटबाजीला बळी पडावे लागले असल्याचे ती सांगते. 2 / 11इतकेच काय तर सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हते असा खुलासा तिने नुकताच केला. आता एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने विविध बाबींवर प्रकाश टाकला. 3 / 11स्टारकिड्सला लगेच संधी मिळते असे सर्वांना वाटते. होय, हे खरे आहे घरच्यांना सांगितल्यावर संधी उपलब्ध होते. माझ्या वडिलांनी मला खूपच सहकार्य केले आहे. पण, प्रत्येक स्टारकिड्सचा प्रवास वेगळा आहे, असे श्रद्धाने आवर्जुन सांगितले.4 / 11'स्टारकिड असेल तर यश मिळेलच असे काही नाही. त्यासाठी तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावेच लागेल. प्रत्येक चित्रपटात चांगली कामगिरी करावी लागेल'5 / 11श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे दोघे मुलाखतीत सहभागी झाले होते. यावेळी श्रद्धाने आणखी सांगितले की, मी अभिनेता हृतिक रोशनची मोठी चाहती आहे. सोशल मीडिया वापरत असताना अनेक भन्नाट कमेंट्स माझे मनोरंजन करतात. माझा सोशल मीडिया मीच हाताळत असल्याने याचा आनंद घेता येतो.6 / 11खरे तर श्रद्धा कपूर सिंगल आहे का? असा प्रश्न विचारला असता तिने सावध उत्तर दिले. ती म्हणाली की, ती एक 'स्त्री' आहे जी सर्वकाही गुप्त ठेवते.7 / 11तसेच मी शांत आहे असे सर्वांना वाटते पण माझ्या घरच्यांना विचारले तर त्यांचे वेगळेच उत्तर मिळेल हे नक्की, असे श्रद्धाने मिश्किलपणे म्हटले.8 / 11श्रद्धाने २०१० साली 'तीन पत्ती' या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला होता. मग तिला बऱ्याचदा नकाराचा सामना करावा लागला. बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध खलनायकाची लेक असूनही तिला पहिल्याच चित्रपटात हवी तशी कामगिरी करता आली नाही.9 / 11पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर श्रद्धाला खूप संघर्ष करावा लागला. अखेर २०१३ साली तिला आशिकी २ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिने जोरदार कमबॅक केला. मोहित सुरीने तिच्यावर विश्वास दाखवत तिला ही सुवर्णसंधी दिली होती. 10 / 11आशिकी २ नंतर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय रातोरात स्टार झाले. तेव्हापासून श्रद्धाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धाच्या नावाची नोंद आहे. 11 / 11