By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:04 IST
1 / 9सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. अनेक आरोप झेलणारी आणि ड्रग्ज प्रकरणा तुरुंगात गेलेली रिया सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.2 / 9होय, रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रिया ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतेय.3 / 9 मल्टी कलर ओपन शर्टमध्ये रियाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. यावर मैसी पोनी टेल, हँगिंग गोल्ड इअररिंग्स घालून तिने तिचा लुक पूर्ण केला आहे.4 / 9तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. 3 तासांत 54 हजारांवर लोकांनी तिच्या या फोटोंना लाईक केलं आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करून रियाचं कौतुक केलं आहे.5 / 9रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप. पण आता रियाने कमबॅकची तयारी सुरु केली आहे.6 / 92009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअॅलिटी शेमध्ये ती फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी ऑडिशन दिले आणि पाठोपाठ सिलेक्टही झाली.7 / 9व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टिकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केलेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अॅक्टंग करिअर खुणावू लागलं. अर्थात रियाचं अॅक्टिंक करिअर फार यशस्वी राहिलं नाही.8 / 9व्हीजे असताना रिया इंजिनिअरिंग करत होती. मात्र अॅक्टिंग करिअरसाठी तिने इंजिनिअरिंग सोडले. 2012 मध्ये तिला पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म ‘तुनीगा तुनीगा’तून पदार्पण केलं. मात्र चित्रपट प्लॉप झाला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.9 / 9गेल्या 8 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता. पुढे रियाचं नाव सुशांत प्रकरणात आला. ड्रग्ज प्रकरणात ती अडकली.